Dhanteras 2023 : धनत्रयोदशीला केला जाणारा हा उपाय आहे अत्यंत प्रभावी, यमदेवाशी आहे संबंध

Dhanteras वर्षभरात फक्त धनत्रयोदशीचा दिवस असतो जेव्हा यमराज या मृत्यूच्या देवतेचे दिवे दान करून पूजा केली जाते. तथापि, काही लोकं नरक चतुर्दशीच्या दिवशी म्हणजे छोटी दिवाळीच्या दिवशी देखील दिवे दान करतात. स्कंद पुराणानुसार कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशीला संध्याकाळी घराबाहेर यमदेवाला अर्पण केल्याने अकाल मृत्यूचा धोका दूर होतो.

Dhanteras 2023 : धनत्रयोदशीला केला जाणारा हा उपाय आहे अत्यंत प्रभावी, यमदेवाशी आहे संबंध
धनत्रयोदशीचे महत्त्वImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Nov 08, 2023 | 9:10 AM

मुंबई : धनत्रयोदशीचा (Dhanteras 2023) सण दिवाळीच्या आधी साजरा केला जातो. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी धनत्रयोदशी साजरी केली जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरीची पूजा आणि नवीन वस्तू खरेदी करण्याचे खूप महत्त्व आहे. असे मानले जाते की धनत्रयोदशीच्या दिवशी सोने, चांदी आणि पितळेची भांडी खरेदी केल्याने अपार सुख आणि समृद्धी मिळते. याशिवाय धनत्रयोदशीचा दिवस हा अकाली मृत्यू आणि शत्रूंपासून मुक्ती मिळवण्याचा दिवस आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी अत्यंत सोपे उपाय केल्यास अकाली मृत्यूचा धोका टाळता येतो. तसेच शत्रूंपासून मुक्ती मिळू शकते. जोतिषी पराग कुळकर्णी यांच्याकडून जाणून घेऊया हा महा उपाय कोणता आहे. तसेच त्याचे धार्मिक महत्त्व काय आहे.

यमदेवाची पूजा धनत्रयोदशीलाच का केली जाते

वर्षभरात फक्त धनत्रयोदशीचा दिवस असतो जेव्हा यमराज या मृत्यूच्या देवतेचे दिवे दान करून पूजा केली जाते. तथापि, काही लोकं नरक चतुर्दशीच्या दिवशी म्हणजे छोटी दिवाळीच्या दिवशी देखील दिवे दान करतात. स्कंद पुराणानुसार कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशीला संध्याकाळी घराबाहेर यमदेवाला अर्पण केल्याने अकाल मृत्यूचा धोका दूर होतो.

धनत्रयोदशी उपाय

अकाली मृत्यू आणि शत्रूंपासून मुक्ती मिळवण्यासाठी धनत्रयोदशीला म्हणजेच कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्ष त्रयोदशीला घराबाहेर यमराजाच्या नावाचा दिवा ठेवावा. या दिवशी दिवा दान केल्याने मृत्यूचा नाश होतो. यासाठी शेणाचा दिवा बनवून त्यात मोहरीचे तेल टाकून तो प्रज्वलित करावा, नंतर घरापासून दूर नेऊन दक्षिणेकडे तोंड करून एखाद्या नदी किंवा तलावाजवळ तो ठेवावा. हा उपा. सुर्यास्तानंतर करावा. तसेच रात्रीच्या वेळी कुटुंबातील सर्व सदस्य घरी आल्यावर देखील हा उपाय करू शकता. यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या अकाली मृत्यूचे संकट टळते आणि कुटूंबातील अडथळे दूर होतात. याशिवाय धनत्रयोदशीच्या दिवशी रात्री दिवा दान केल्याने शत्रूंचा नाश होतो.

हे सुद्धा वाचा

देव असुनही का केली जात नाही यमराजाची पूजा?

हिंदू धर्मात प्रत्त्येक देवी देवताला एक विशेष स्थान आहे. प्रत्त्येक जण कोणत्या ना कोणत्या देवाची उपासना करत असतो, मात्र कोणी यमदेवाची पुजा किंवा त्याची उपासना करत असल्याचे आपण कधीत एकत नाही. यामागचे कारण जाणून घेण्याचा तुम्ही कधी प्रयत्न केला आहे का? आपण ज्या देवाची पूजा किंवा उपासना करतो त्या देवाचे आपल्यावर आशिर्वाद राहातात. त्या देवतेचे तत्व आपल्या अवतीभोवती असतात, मात्र सूर्यपुत्र यमदेव हे मृत्यूची देवता आहे. त्यांना प्रसन्न करणे किंवा त्यांची उपासना करणे म्हणजे मृत्यू ओढावून घेण्यासारखे आहे. त्यामुळेच यमदेवाची पूजा हिंदू धर्मात केली जात नाही. फक्त धनत्रयोदशीच्या दिवशी यमदेवाच्या नावाने दक्षिण दिशेला दिवा लावला जातो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर.
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य.
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'.
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'.
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?.
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड.
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा.
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी.
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक.
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद.