Ramadan | रमजानचे रोजे करताय?  मग मधुमेह असणाऱ्यांनी या ‘टीप्स्‌’ लक्षात ठेवा

रमजान महिन्यात मुस्लीम बांधव साधारणत: एक महिना रोजे धरत असतात. रोजांच्या दरम्यान, सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत काहीही खाण्याला तसेच पिण्याला मनाई असते. तर दुसरीकडे मधुमेह असलेल्या रुग्णांना जास्त वेळ उपाशी न राहण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात येत असतो. त्यामुळे मधुमेही लोकांनी रोजे धरताना आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्‍यक असते.

Ramadan | रमजानचे रोजे करताय?  मग मधुमेह असणाऱ्यांनी या ‘टीप्स्‌’ लक्षात ठेवा
ramdaan
Follow us
| Updated on: Apr 02, 2022 | 10:50 AM

मुंबई : रमजान (Ramzan 2022) महिना हा मुस्लीम बांधवांसाठी अतिशय पवित्र असतो. इस्लामिक वर्षानुसार हा त्यांचा नववा महिना असतो. हा संपूर्ण महिनाभर ते रोजा (Roza) धरत असतात. आज (2 April) जर चंद्रदर्शन झाले तर उद्यापासून (3 एप्रिल) पहिला रोजा ठेवण्यात येईल. या काळात सुर्योदयापासून ते सुर्यास्तापर्यंत काहीही खाण्या-पिण्यास बंदी असते. एवढच नाही तर अनेक मुस्लीम बांधव आपली लाळदेखील गिळत नाहीत. रोजे ठेवण्यामध्ये वयस्कर लोकांचाही मोठ्या संख्येने समावेश असतो. यात जर ते मधुमेही (diabetic) असतील तर त्यांनी विशेष काळजी घेणे आवश्‍यक असते. अनेकदा तज्ज्ञ सांगतात, की मधुमेहाच्या रुग्णांनी जास्त वेळ उपाशी राहणे योग्य नसते. यात, रोजे धरताना 14 ते 15 तास काहीही न खाणे मधुमेहींसाठी किती हानीकारक आहे? याची चर्चा या लेखातून करणार आहोत.

रोजे धरताना ही काळजी अवश्‍य घ्या

1) सर्वात आधी आजार किंवा आरोग्याविषयक समस्या असलेल्या लोकांना रोजे धरण्यापासून सूट देण्यात आली आहे. त्यामुळे जर आपल्याला आरोग्यविषयक काही समस्या असतील तर तुम्ही रोजे न धरलेले बरे असते. परंतु अनेक लोक तरीही रोजे धरत असतात. बराच वेळ उपाशी राहिल्याने मधुमेही लोकांच्या शरीरात अचानक ग्लुकोजची कमी निर्माण होऊ शकते. यामुळे हाइपोगिलेसेमियाची समस्या निर्माण होउ शकते. यात रुग्णांना चक्कर येउन ते बेशुध्ददेखील होऊ शकतात. त्यातच जर रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यास डोळ्यांभोवती अंधारे येणे, अंधूक दिसणे, चक्कर येणे, अशक्तपणा वाटणे आदी समस्या निर्माण होत असतात. जर तरीही तुम्ही रोजा धरण्यासाठी आग्रही असाल तर पहिल्यांदा याबाबत तज्ज्ञांचा सल्ला अवश्‍य घ्यावा.

2) रोजे धरताना उपाशी राहिल्याने यातून मधुमेहासोबत रक्तदाबाची समस्यादेखील निर्माण होऊ शकते. रोजादरम्यान, नियमितपणे आपल्या रक्तदाबाची तपासणी केली पाहिजे. यात काही अडचणी वाटल्या तर तत्काळ तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. त्याप्रमाणे रोजे धरताना कुठल्याही प्रकारचा तणाव ठेवू नका, यातून रक्तदाब वाढण्याचा धोका निर्माण होतो.

3) रोजे धरत असताना शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण कसे नियंत्रित करावे, याबाबत तज्ज्ञांचा विशेष सल्ला घ्यावा. सेहरीदरम्यान, जेव्हा तुम्ही काही खायला घेता तेव्हा अगोदर आपल्या रक्तदाबाची तपासणी अवश्‍य करुन घ्यावी. त्यानुसारच आपला रोजचा डाएट ठेवावा.

4) दिवसभर उपास केल्यानंतर अनेक लोक सेहरीच्या वेळी खूप खातात. परंतु यातून शरीरातील ग्लुकोजची मात्रा अचानक वाढण्याचा धोका निर्माण होत असतो. त्यामुळे बराच काळ उपाशी राहिल्यानंतर एकदम अन्न खाउ नये. आपल्या डाएटमध्ये फळे, भाज्या, दाळी आदींचा अवश्‍य समावेश करावा. कार्बोहाइड्रेट असलेले घटक कमी खावीत. रोजादरम्यान तुम्ही विशेष डाएट चार्टदेखील तयार करु शकतात.

5) रोजे धरत असताना अन्नासह पाणीदेखील पिण्यास बंदी असते. अशा वेळी बराच काळ शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झालेली असते. त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता होणार नाही, याचे नियोजन करावे. शरीरात पाण्याची कमतरता पडू देउ नका, सेहरीच्या वेळी जास्त पाणी प्या, जेवणात सलाद, काकडी, टमाटा आदींचा वापर करा.

(टीप : सदर मजकूर उपलब्ध माहितीवर आधारीत आहे. याला कुठल्याही प्रकारचा सल्ला समजू नये, अधिक माहितीसाठी कृपया तज्ज्ञांशी संपर्क साधावा.)

संंबंधीत बातम्या :

Gudi padwa | श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मांदियाळी

Zodiac | नव वर्षाला या 4 राशींच्या आयुष्यातील प्रत्येक दुःख संपणार, शनीच्या संक्रमणाने होणार धनलाभ

Gudi Padwa Wishes Marathi New Year : शुभेच्छांच्या माध्यमातून नात्यांमध्ये प्रेम वाढवू , आनंदाने नववर्षाचे स्वागत करु, गुढीपाडव्यासाठी मराठी शुभेच्छा संदेश, इमेज

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.