हवन केल्याने वास्तु आणि ग्रह दोषातून मुक्तता मिळेल, जाणून घ्या याचं धार्मिक आणि वैज्ञानिक महत्व

हिंदू धर्मात होमहवन आणि यज्ञाला विशेष महत्त्व आहे (Difference Between Havan And Yagya). हवन केल्याने सकारात्मक शक्तीचा निर्माण होतो. अनेक अभ्यासांमध्ये हे स्पष्ट झाले आहे की, हवन केल्याने प्रदूषणमुक्त वातावरण मिळते.

हवन केल्याने वास्तु आणि ग्रह दोषातून मुक्तता मिळेल, जाणून घ्या याचं धार्मिक आणि वैज्ञानिक महत्व
havan
Follow us
| Updated on: May 19, 2021 | 12:40 PM

मुंबई : हिंदू धर्मात होमहवन आणि यज्ञाला विशेष महत्त्व आहे (Difference Between Havan And Yagya). हवन केल्याने सकारात्मक शक्तीचा निर्माण होतो. अनेक अभ्यासांमध्ये हे स्पष्ट झाले आहे की, हवन केल्याने प्रदूषणमुक्त वातावरण मिळते. यामुळे आपले आरोग्य सुधारते. धार्मिक शास्त्रानुसार, वाईट घटनांना टाळण्यासाठी किंवा इच्छा पूर्ण करण्यासाठी हवन केले जात असत. चला तर या हवनच्या फायद्यांविषयी जाणून घेऊया (Difference Between Havan And Yagya Know The Spiritual As Well As Scientific Benefits)

हवनमध्ये, बेलपत्र, कडुलिंब, कलिंगज, आंब्याचे लाकूड, पिंपळाची साल, पलाशचे रोप, देवदार वृक्षाचे खोड, बोर, कापूर, साखर, जव, तांदूळ, चंदनाचे लाकूड इत्यादी सामुग्रीला अग्नित टाकले जाते. यामधून निघणाऱ्या धुराने वातावरण शुद्ध होते. हे सर्व घटक आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. शास्त्रज्ञांच्या मते, हवनात शेणाच्या गोवऱ्यांचा वापर होतो, ज्यामुळे 94 टक्के बॅक्टेरिया नष्ट होतात. याशिवाय हवन केल्याने अनेक आजारांपासून मुक्तता मिळते.

ग्रहदोषातून मुक्तता मिळते

जर तुमच्या जीवनात ग्रहदोषांची समस्या असेल, तर तुम्ही हवन केले पाहिजे. हवन केल्याने ग्रहांची स्थिती शांत होते. ग्रहांशी संबंधित असलेल्या दिवशी संकल्प करुन अकरा किंवा एकवीस दिवस उपवास ठेवून पूर्णाहुती अर्पण केल्याने सर्व दुःख दूर होतात. हवन केल्यानंतर ब्राह्मणांना जेवायला द्या. यानंतर पैसे आणि कपड्यांचे दान करा.

वास्तू दोष दूर होतात

वास्तुशास्त्रानुसार, हवन पूजा केल्याने वातावरणात सकारात्मक उर्जेचा संचार होतो. घर बांधताना वास्तू दोष दूर करण्यासाठी हवन केले जाते. घर बांधण्यात कोणत्याही प्रकारचे वास्तू दोष असू नये म्हणूनच बांधकामापूर्वी शुभ मुहूर्तावर भूमिपूजन आणि शिलान्यासची पूजा केली जाते. यानंतर घरात प्रवेश करण्यापूर्वी घराच्या प्रवेशद्वाराची पूजा केली जाते. जेणेकरुन आतील आणि बाहेरील वातावरण शुद्ध आणि पवित्र बनेल.

हवन आणि यज्ञात काय फरक आहे?

हवन ही एक छोटी पूजा आहे. यामध्ये मंत्रांचा जाप करुन अग्नित आहुती अर्पण केली जाते, या प्रक्रियेला हवन म्हणतात. तुम्ही हे संपूर्ण कुटुंबासह करु शकता. यज्ञ हे एक विशिष्ट अनुष्ठान असते. यज्ञ हे एखाद्या खास उद्देशासाठी केलं जातं. यामध्ये देवता, आहुती, वेद मंत्र आणि दक्षिणा अनिवार्य असते.

Difference Between Havan And Yagya Know The Spiritual As Well As Scientific Benefits

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti : कोणाचीही पारख करताना या 4 गोष्टींकडे लक्ष द्या, कधीही होणार नाही धूळफेक

Vastu Tips | घरात चुकूनही या वस्तू ठेवू नका, अन्यथा सुख-समृद्धीपासून नेहमी राहाल वंचित

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.