Sanyas: नऊ कोटी पगार असेलला JOB रिजेक्ट करुन वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी बनली संन्यासी; जळगावच्या उच्च शिक्षित आणि श्रीमंत दिक्षाचे प्रोफाईल बघून चाट पडाल

संयमश्रीजी महाराज म्हणजेच आताच्या दिक्षा बोरा यांचा संन्यासघेण्या अगोदरचा जीवन प्रवासही रंजक आहे. त्यांना एक भाऊ आणि एक बहीण आहे. तसेच त्या सुखव व श्रीमंत परिवारातून असून कॅलिफोर्निया येथील कंपनीने त्यांना व्यक्तिमत्व विकासाचा जॉब ऑफर करताना तब्बल नऊ कोटीचे पॅकेज देण्याचे कबूल केले. मात्र ही संधी न स्वीकारता त्यांनी संन्यास घेणंच पसंत केले.

Sanyas: नऊ कोटी पगार असेलला JOB रिजेक्ट करुन वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी बनली संन्यासी; जळगावच्या उच्च शिक्षित आणि श्रीमंत दिक्षाचे प्रोफाईल बघून चाट पडाल
Follow us
| Updated on: Jul 09, 2022 | 9:42 PM

जळगाव: उच्च शिक्षित, श्रीमंत, सर्व सुखसुविधा असूनही तरूण वयात संन्यास घेतला.  जळगावच्या(Jalgaon) दिक्षा बोरा(Diksha Bora) आणि आताच्या संयमश्रीजी महाराज असे या तरुणीचे नाव आहे. शिक्षण घेत असताना त्यांनी 2013 ला जैन धर्माच्या कार्यक्रमाला हजेरी लावली आणि तेथून त्यांनी निश्चय केला की, मला संन्याशी जीवन जगायचे  आहे. परंतु यासाठी घरच्यांची परवानगी हवी होती आणि घरच्यांचा होकार मिळवण्यासाठी तब्बल आठ वर्षे प्रतीक्षा करावी लागली. दिक्षा बोरा यांनी घराच्यांच्या संमतीने अखेरीस 9 डिसेंबर 2019 रोजी धर्मप्रचारासाठी वयाच्या 22 व्या वर्षी संन्यास घेऊन स्वतःला झोकून दिले.

दिक्षा बोरा अताचे संयमश्रीजी महाराज यांना BBA मधून पुणे येथून आपल शिक्षण पूर्ण केलं आहे. दिक्षा बोरा या राष्ट्रीय मॅरेथॉन खेळाडू आहेत. तसेच शिक्षण घेत असताना क्रीडा, वादविवाद, कला, गायन, संभाषण आधी प्रकारांमध्ये त्यांनी उल्लेखनीय यश मिळवले.

संयमश्रीजी महाराज म्हणजेच आताच्या दिक्षा बोरा यांचा संन्यासघेण्या अगोदरचा जीवन प्रवासही रंजक आहे. त्यांना एक भाऊ आणि एक बहीण आहे. तसेच त्या सुखव व श्रीमंत परिवारातून असून कॅलिफोर्निया येथील कंपनीने त्यांना व्यक्तिमत्व विकासाचा जॉब ऑफर करताना तब्बल नऊ कोटीचे पॅकेज देण्याचे कबूल केले. मात्र ही संधी न स्वीकारता त्यांनी संन्यास घेणंच पसंत केले.

जीवनात पैसाच सर्व काही नसतो आपल्या मनाचा आनंद कशात आहे हे देखील महत्वाचे असते. आणि आनंद गुरूच्या चरणी मिळतो म्हणुन मी ठरवलं मला माझ्या गुरूच्या चरणी जायचं. नऊ कोटींचा आकडा ऐकल्यावर प्रत्येकाला आश्चर्य वाटते परंतु मला अजूनही वाटत नाही की, मी नऊ कोटी रुपये सोडून आले. पैशा मागे धावण्यापेक्षा आपण कमावलेल्या पैशात सुखी आहोत का? आपल्या जीवनात आपण सुखी आहोत का? याचा शोध आपण घेतला पाहिजे अशी प्रतिक्रिया दिक्षा बोरा आताच्या संयमश्रीजी महाराज त्यांनी व्यक्त केली.

प्रेम विवाह करणाऱ्या जोडप्याने स्वत:च्या लहान मुलांना पाहून घेतला संन्यास; लाखोंची कमाई, सुखी संसार सगळ्याचाच केला त्याग

सर्व सुखांचा त्याग करत सन्यास घेणाऱ्या अहमदाबादच्या एका जोडप्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. 13 वर्षांपूर्वी यांचा प्रेमविवाह झाला होता. त्यांनी आता संन्यास घेण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या मुलांचं अनुसरण करुन वैराग्याचा मार्ग स्वीकारला आहे.

प्रियांक वोहरा हे अहमदाबादचे मोठे व्यापारी आहेत. त्यांचा भव्यता वोहरा यांच्यासह प्रेमविवाह झाला होता. बिझनेसमध्ये ते सेटल आहेत. त्यांचा संसारही सुखात सुरु होता. मात्र, त्यांचा मुलगा सुर आणि मुलगी सिरी यांनी संन्यास्तव स्वीकारले आहे.

वोहरा यांच्या मुलांनी दोन वर्षांपूर्वी संन्यासत्व स्वीकारले आहे. यानंतर 70 लाख रुपयांपेक्षा जास्त वार्षिक उलाढाल असलेला त्यांचा ऑटो पार्ट्सचा व्यवसाय वोहरा यांची अवघ्या चार दिवसांत बंद करुन मुलांप्रमाणे संन्यासत्व स्वीकारण्याचा निर्णय घेतला.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.