Diwali 2022: दिवाळीत वास्तुशास्त्रानुसार अशा प्रकारे काढा रांगोळी

दिवाळीच्या सणाला रांगोळी काढण्याचे विशेष महत्त्व आहे. या सणाला वास्तुशास्त्रानुसार रांगोळी काढल्यास विशेष लाभ मिळेल.

Diwali 2022: दिवाळीत वास्तुशास्त्रानुसार अशा प्रकारे काढा रांगोळी
रांगोळी Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Oct 20, 2022 | 11:56 PM

मुंबई,  दिवाळीच्या सणात दिव्यांप्रमाणेच रांगोळीलादेखील महत्त्व आहे. यामागे विविध धार्मिक श्रद्धा आहेत. एका मान्यतेनुसार, दिवाळीच्या दिवशी भगवान श्रीराम 14 वर्षांच्या वनवासानंतर आणि रावणाचा वध करून अयोध्या नगरी परतले तेव्हा त्यांच्या आगमनाप्रीत्यर्थ आनंदात लोकांनी संपूर्ण अयोध्या सजवली आणि दिवे लावले. यासोबतच दारासमोर रांगोळी देखील काढल्या  तेव्हापासून आजतागायत दिवाळीच्या दिवशी रांगोळी, दिवे आदींनी घर सजवण्याची परंपरा सुरू आहे. दिवाळीच्या दिवशी काढलेली रांगोळी हे समृद्धीचे प्रतीक मानले जाते. असे मानले जाते की घराच्या बाहेर आणि आत काढलेली रांगोळी देवी लक्ष्मीच्या स्वागतासाठी काढली जाते. यामुळे लक्ष्मी प्रसन्न राहते. दीपावलीच्या दिवशी घराच्या कोणत्या कोपऱ्यात शुभ आणि सौभाग्य वाढवणारी रांगोळी कशी काढावी आणि त्याचे धार्मिक महत्त्व काय आहे, ते जाणून घेऊया.

  1. रांगोळी हा शब्द ‘रंग’ आणि ‘अवल्ली’ या दोन शब्दांच्या संयोगातून तयार झाला आहे, ज्याचा अर्थ आहे – रंगांची रांग. दीप -उत्सवात ही प्राचीन कला बनवण्याचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे.
  2. घराच्या आत आणि बाहेर अनेक प्रकारची रांगोळी काढली जाते, परंतु दीपावलीच्या दिवशी कमळाची रचना केलेली रांगोळी काढणे खूप शुभ मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, दिवाळीला कमळाची रांगोळी काढल्यास देवी लक्ष्मी लवकर प्रसन्न होते, कमळाला लक्ष्मीचे आसन मानले जाते.
  3. वास्तूनुसार दिवाळीच्या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर रांगोळी काढावी. या ठिकाणी रांगोळी काढण्यासाठी विशेषतः लाल, पिवळा, हिरवा, गुलाबी, केशरी या रंगांचा वापर करावा. असे मानले जाते की या रंगांचा वापर केल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते. वास्तूनुसार रांगोळीसाठी काळा रंग वापरू नये.
  4. रांगोळी काढताना तुमचे बोट आणि अंगठा मिळून ज्ञानमुद्रा (प्राणायाम मुद्रा) बनवतात. असे मानले जाते की बोटांच्या या आसनांमुळे तुमचा मेंदू अधिक उत्साही आणि सक्रिय होतो, तसेच तुमची बौद्धिक शक्ती वाढते.
  5. हे सुद्धा वाचा
  6. रांगोळी काढताना मैदा, तांदूळ, हळद, कुमकुम, फुले, पाने यांचा वापर करणेही खूप शुभ मानले जाते. तुम्हाला हवं असेल तर दिवाळीच्या दिवशी वेगवेगळ्या रंगात रंगवून रांगोळी बनवण्यासाठी तुम्ही तांदूळही वापरू शकता.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार.
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी.
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू.
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा.
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप.
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.