Diwali 2022: दिवाळीत वास्तुशास्त्रानुसार ठेवा दिवे, वर्षभर राहील लक्ष्मीचा वास
दिवाळीचा सण आठवड्यावर आला आहे. या सणाला दिव्यांचे विशेष महत्त्व असते. वास्तुशास्त्रानुसार जाणून घेऊया कुठे दिवा लावल्याने अधिक शुभ परिमाण मिळतील.
मुंबई, दिवाळी (Diwali 2022) हा सण म्हणजे दिव्याचा उत्सव. दीपावली किंवा दिवाळी हजारों वर्षापासून चालत आलेला हिंदू उत्सव आहे. दिवाळी हा सण म्हणजे अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतीक आहे. त्यामुळे या सणाला दिव्यांचे विशेष महत्त्व आहे. दिवाळी हा सण प्रकाशपर्व म्हणून देखील ओळखला जातो. या सणाला प्रकाशाचे खूप महत्व आहे. दिवाळी ही अमावस्येच्या दिवशी येत असते जेव्हा सर्वत्र काळोख पसरलेला असतो तेव्हा या काळोखाला दिव्याची एक छोटीशी ज्योत दूर करते. असा हा दिवाळीचा सण यंदा 24 ऑक्टोबरला साजरा होणार आहे. या दिवशी लक्ष्मी पूजनाला वास्तुशास्त्रानुसार दिवे लावल्यास वर्षभर लक्ष्मीचा वास राहील. जाणून घेऊया कुठे आणि कशा प्रकारे दिवे लावावे.
- दिवाळीच्या दिवशी तुळशीजवळ दिवा अवश्य लावावा. असे केल्याने सर्व नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि घरात सुख-शांती राहते.
- दिवाळीच्या दिवशी दिव्यात जळणाऱ्या तेलालाही खूप महत्त्व आहे. हे तेल घराची ऊर्जा ठरवते. दुसरीकडे, दिव्याची वात आत्म्याचे प्रतीक मानली जाते. यामुळे आत्म्याचे शुद्धीकरणही प्रज्वलित दिव्याने होते.
- वास्तुशास्त्रानुसार ज्या ताटात दिवा लावला जातो, त्या ताटात सोन्याचे किंवा चांदीचे दागिने ठेवावेत. यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो.
- घराजवळ मंदिर असेल तर सर्वप्रथम तिथे जाऊन दिवा ठेवावा. त्यानंतर घरातील पूजेच्या ठिकाणी आणि बाकीच्या ठिकाणी दिवा लावावा.
- दिवाळीच्या दिवशी मंदिरात दिवा लावल्यानंतर सर्वप्रथम घरातील देवघरासमोर दिवा लावावा. जर पूजा ईशान्य दिशेला असेल तर तेथे दिवा लावल्याने शुभ फळ मिळते.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)