धनतेरस उपाय
Image Credit source: Social Media
मुंबई, रविवार 23 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशीचा सण (Dhanteras Upay) आहे. धनत्रयोदशीला पितळेची आणि चांदीची भांडी खरेदी करण्याची परंपरा आहे. असे मानले जाते की या दिवशी भांडी खरेदी केल्याने संपत्ती आणि समृद्धी प्राप्त होते. धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी यमदेवाला दिवा दान केला जातो. धनत्रयोदशीच्या दिवशी केलेले काही उपाय खूप फायदेशीर असतात. यामध्ये झाडूशी संबंधित उपाय विशेषतः प्रभावी आहेत. चला जाणून घेऊया झाडूशी संबंधित या उपायांविषयी, जे धनत्रयोदशीच्या दिवशी देवी लक्ष्मीच्या आशीर्वादासाठी केले जातात.
धनत्रयोदशीला करा झाडूचे हे उपाय
- ज्योतिषशास्त्रानुसार झाडूचा संबंध धनाची देवी लक्ष्मीशी आहे. त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन झाडू खरेदी करावा. या दिवशी झाडू दान करणे देखील खूप शुभ मानले जाते.
- पैशाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी धनत्रयोदशीच्या दिवशी तीन झाडू खरेदी करा त्यापैकी एक मंदिरात चुपचाप ठेऊन या. असे मानले जाते की यामुळे सर्व प्रकारचे आर्थिक त्रास दूर होतात.
- धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन झाडू खरेदी करा आणि त्याच झाडूने संपूर्ण घर स्वच्छ करा. वापरल्यानंतर, हा झाडू कुठेतरी लपवून ठेवा जेथे लोक पाहू शकत नाहीत.
- धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन झाडू आणा पण जुना झाडू फेकून देऊ नका. धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी जुन्या झाडूची पूजा करा. यानंतर नवीन झाडूची पूजा करा आणि घरात सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करा.
- जुन्या झाडूला काळा धागा बांधा आणि तो दाराच्या मागे ठेवा. यामुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही.
झाडू हे देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते, म्हणून झाडूचा अनादर करणे म्हणजे संपत्तीची देवी लक्ष्मीचा अनादर करणे होय. असे केल्याने माता लक्ष्मी नाराज होते.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)