Diwali 2023 : चौदा वर्षांच्या वनवासानंतर राम जेव्हा अयोध्येत परतले, तेव्हा त्यांनी पहिले कोणाची भेट घेतली?

चौदा वर्षांचा वनवास भोगून प्रभू राम अयोध्यानगरीत परतले तेव्हा अयोध्यावासीयांची मने आनंदाने भरून आली. करुणेचा महासागर असलेल्या आपल्या प्रिय श्री रामाचे अयोध्येत आगमन साजरे करण्यासाठी अयोध्येतील लोकांनी त्या रस्त्यावर फुलांची उधळण केली होती आणि ठिकठिकाणी दिव्यांच्या रांगा लावल्या होत्या.

Diwali 2023 : चौदा वर्षांच्या वनवासानंतर राम जेव्हा अयोध्येत परतले, तेव्हा त्यांनी पहिले कोणाची भेट घेतली?
श्रीरामImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Nov 02, 2023 | 9:12 AM

मुंबई : दिवाळी (Diwali 2023) हा हिंदू धर्माच्या श्रद्धेशी निगडित एक अतिशय महत्त्वाचा सण आहे. हा सण प्रकाशाचा सण आहे, विजयाचा सण आहे, देदीप्यमान दिवाळीचा सण संपूर्ण भारताच्या श्रद्धेचा सण आहे. त्रेतायुगातील चौदा वर्षांचा वनवास संपवून भगवान राम आपल्या साकेत धाम अयोध्येत परतले तेव्हा दिवाळीचा पहिला सण अयोध्या शहरात साजरा करण्यात आला. अयोध्येला येण्यापूर्वी प्रभू राम कोणाला भेटले आणि त्रेतायुगात प्रभू राम अयोध्येला पोहोचले, तेव्हा अयोध्येतील लोकांनी त्यांचे स्वागत कसे केले? दिवाळीचा आगामी सण लक्षात घेऊन आज आपण राम युगात डोकावणार आहोत.

भाऊ भरतच्या भेटीसाठी आतूर होते श्रीराम

जेव्हा प्रभू राम वनवासासाठी अयोध्या सोडून गेले. तेव्हा त्यांचा प्रिय बंधू भरत याने नवस घेतला आणि श्रीरामाला सांगितले की, तुझा भाऊ भरत आजपासून हे व्रत घेतो की जोपर्यंत तू चौदा वर्षे वनवासात राहशील, तोपर्यंत तुझ्या कल्याणासाठी मी चौदा वर्षे अयोध्येतील नंदीग्राममध्ये राहीन आणि तपश्चर्या करीन. भरतने श्रीरामाला सांगितले की जर तुम्ही चौदा वर्षांचा वनवास पूर्ण करून शेवटच्या दिवशी अयोध्येला आला नाही तर तुमचा भाऊ भरत प्राणाची आहुती देईल. श्रीरामांनी आपल्या प्रिय बंधू भरतला मनापासून मिठी मारली आणि म्हणाले की भरत, मी वचन देतो की, माझ्या वडिलांनी दिलेल्या आज्ञेनुसार चौदा वर्षांचा वनवास संपवून मी अयोध्येला येईन. जेव्हा प्रभू राम चौदा दिवसांचा वनवास संपवून अयोध्येला येत होते तेव्हा सर्वप्रथम ते अयोध्येतील नंदीग्राममध्ये आपला भाऊ भरत यांना भेटले आणि त्यांनी आपल्या प्रिय बंधू भरतला प्रेमाने मिठी मारली.  या क्षणाला भरत मिलाप असे म्हणतात.

प्रभू राम अयोध्येत परतले तेव्हा त्यांचे भव्य स्वागत झाले

चौदा वर्षांचा वनवास भोगून प्रभू राम अयोध्यानगरीत परतले तेव्हा अयोध्यावासीयांची मने आनंदाने भरून आली. करुणेचा महासागर असलेल्या आपल्या प्रिय श्री रामाचे अयोध्येत आगमन साजरे करण्यासाठी अयोध्येतील लोकांनी त्या रस्त्यावर फुलांची उधळण केली होती आणि ठिकठिकाणी दिव्यांच्या रांगा लावल्या होत्या. त्यावेळी अयोध्या नगरी संपूर्ण विश्वात सर्वात तेजस्वी बनली होती. घरी परतल्याच्या आनंदात अयोध्येतील लोक मंगल गीत गात होते. रामावर फुलांचा वर्षाव करत होते. अयोध्या नगरीच्या तुलनेत स्वर्गही फिका पडला आहे असे वाटत होते. तो क्षण पाहण्यासारखा होता, या सर्व गोष्टींचे वर्णन रामचरितमानस या ग्रंथात आहे.

हे सुद्धा वाचा

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.