Diwali 2024 : आज ‘या’ राज्यांत साजरी होणार दिवाळी, पूजेसाठी किती मिनिटं मुहूर्त.?

Laxmi Puja : दिवाळीच्या सणाला धूमधडाक्यात सुरूवात झाली आहे. काही राज्यांमध्ये काल, अर्थात 31 ऑक्टोबरला दिवाळी साजरी करण्यात आली आहे. मात्र काही राज्यांमध्ये दिवाळी आज 1 नोव्हेंबर रोजी साजरी करण्यात येईल. अमावस्या तिथीच्या शेवटी लक्ष्मीपूजनाची सांगता होईल.

Diwali 2024 : आज 'या' राज्यांत साजरी होणार दिवाळी, पूजेसाठी किती मिनिटं मुहूर्त.?
दिवाळीचा देशभरात उत्साह
Follow us
| Updated on: Nov 01, 2024 | 9:57 AM

देशभरात दिवाळीच्या सणाला उत्साहात, धूमधडाक्यात सुरूवात झाली असून लहान-मोठो सर्वच जण प्रकाशाचा हा सण आनंदाने साजरा करताना दिसत आहेत. देशभरात काहीव ठिकाणी काल, 31 ऑक्टोबरला दिवाळी साजरी झाली. तर काही राज्यांत मात्र आजा, 1 नोव्हेंबर रोजी दिवाळी साजरी होत आहे. यावेळी दिवाळीच्या तारखेबाबत देशभरात संभ्रम निर्माण झाला होता. कारण कार्तिक महिन्यातील अमावस्येच्या तिथीला दिवाळी साजरी करण्याची परंपरा आहे. काही लोकांनी 31 ऑक्टोबरला दिवाळी साजरी केली आणि काही राज्यांमध्ये 1 नोव्हेंबरला, आज दिवाळी साजरी होणार आहे.

पंचांगानुसार, दिवाळी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी 31 ऑक्टोबर रोजी दुपारी 3.22 वाजता सुरू झाली असून ती 1 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6.16 वाजता संपेल. त्यामुळे 1 नोव्हेंबरला लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 5:36 ते 6:16 पर्यंत असेल. या काळात भाविकांना पूजेसाठी एकूण 41 मिनिटे वेळ मिळणार आहे.

1 नोव्हेंबरला कोणकोणत्या राज्यांत साजरी होणार दिवाळी ?

दिल्ली, मुंबई, राजस्थान आणि उत्तराखंडमध्ये आज 1 नोव्हेंबर रोजी दिवाळी साजरी केली जाईल. तर दिल्ली आणि मुंबईच्या काही भागात, आधीच म्हणजे 31 ऑक्टोबरला दिवाळी साजरी करण्यात आली आहे. ज्या राज्यांमध्ये 31 ऑक्टोबरला दिवाळी साजरी झाली ते आता गोवर्धन पूजेची वाट पाहत आहेत. मात्र देशभरातील मोठ्या मंदिरांमध्ये 1 नोव्हेंबरला दिवाळी साजरी होणार असल्याने अनेक लोकांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे काही जण 31 तारखेला तर काही जण आज 1 नोव्हेंबरला दिवाळीत पूजा करत आहेत.

उत्तराखंड आणि मुंबई

ज्योतिषांच्या मते, उत्तराखंड राज्यात दिवाळी शुक्रवार, 1 नोव्हेंबर रोजी येत आहे. मात्र, शासकीय कर्मचाऱ्यांची औपचारिक सुट्टी केवळ 31 ऑक्टोबर रोजीच होती आणि दिवाळी 1 नोव्हेंबर रोजी साजरी होणार असून मुंबईतही दिवाळीबाबत दोन भिन्न मतप्रवाह निर्माण झाले आहेत. त्यामुळेच मुंबईतील काही भागात 31 ऑक्टोबर रोजी दिवाळी साजरी करण्यात आली तर काही भागात ती आज 1 नोव्हेंबर रोजी साजरी होणार आहे.

धार्मिक शास्त्रानुसार प्रदोष काळात अमावास्येची तिथी दोन दिवस दिसत असेल तर अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी लक्ष्मीची पूजा करणे शास्त्रानुसार मानले जाते. अमावस्या आणि प्रतिपदा या दिवशी लक्ष्मीची पूजा करणे योग्य मानले जाते. त्यामुळे या राज्यांमध्ये एक नोव्हेंबरलाच लक्ष्मीपूजन केले जाणार आहे. कारण येथील लोक सूर्योदयाच्या तिथीनुसार दिवाळीची पूजा करणार आहेत.

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.