Diwali 2024 : लक्ष्मीपूजन नेमकं कधी? 31 ऑक्टोबर की 1 नोव्हेंबर! जाणून घ्या तिथी आणि पूजा मुहूर्त

दिवाळीत लक्ष्मीपूजनाचं खास महत्त्व सांगितलं गेलं आहे. या दिवशी देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त व्हावी म्हणून पूजा केली जाते. पण अनेकदा लक्ष्मी पूजनाचा नेमका मुहूर्त कोणता यावरून संभ्रम असतो. तिथी दोन दिवशी पडली संभ्रम वाढतो. तुम्हालाही असाच संभ्रम असेल तर त्याबाबत सविस्तर जाणून घ्या

Diwali 2024 : लक्ष्मीपूजन नेमकं कधी? 31 ऑक्टोबर की 1 नोव्हेंबर! जाणून घ्या तिथी आणि पूजा मुहूर्त
Follow us
| Updated on: Oct 24, 2024 | 7:46 PM

हिंदू धर्मात दिवाळी सणाचं विशेष महत्त्व आहे. संपूर्ण देशात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. पंचांगानुसार अश्विन कृष्ण अमावस्येला देवी लक्ष्मीची आराधना केली जाते. देवी लक्ष्मीचं पूजन अश्विन अमावस्येला केलं जातं. इतर दिवशी अमावस्या म्हंटलं की मन कावरंबावरं होतं. पण दिवाळीतील अमावस्येचं महत्त्व लक्ष्मीपूजनामुळे वाढते. या दिवशी देवी लक्ष्मीसोबत, धनदेवता कुबेर आणि गणपतीची पूजन करणं शुभ मानलं जातं. त्यामुळे हा दिवशी मोठ्या भक्तिभावाने घरोघरी पूजा केली जाते. पण यंदा दिवाळीच्या तिथीवरून गोंधळाचं वातावरण आहे. नेमका लक्ष्मी पूजनाचा मुहूर्त कधी आहे. 31 ऑक्टोबर की 1 नोव्हेंबर, त्यामुळे संभ्रमाचं वातावरण आहे. ज्योतिष्यांनी लक्ष्मीपूजन नेमकं कधी करावं, याबाबत सांगितलं आहे. वैदिक पंचांगानुसार हिंदू धर्मात कोणताही सण हा उदय तिथीनुसार साजरा केला जातो. त्यामुळे उदय तिथी खूपच महत्त्वाची ठरते.

दिवाळीत देवी लक्ष्मीची पूजा ही प्रदोष काळात केली जाते. अमावास्या ही 31 ऑक्टोबरला दुपारी 3 वाजून 52 मिनिटांनी सुरु होते. तसेच अमावास्या ही 1 नोव्हेंबरला सध्याकाळी 6 वाजून 16 मिनिटांनी संपत आहे. त्यामुळे लक्ष्मी पूजन नेमकं 31 तारखेला करायचं की 1 नोव्हेंबरला असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. ज्योतिषीनुसार, उदय तिथी 1 नोव्हेंबरला येत आहे, त्यामुळे या दिवशी लक्ष्मी पूजन केलेलं लाभदायी ठरेल. कारण भारतीय शास्त्रात उदय तिथीला महत्त्व आहे.

1 नोव्हेंबरला संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांपासून रात्री 8 वाजून 35 मिनिटांपर्यंत लक्ष्मी पूजनाचं मुहूर्त असल्याचं सांगण्यात आला आहे. पंचांगातही हा मुहूर्त सांगितला गेला आहे. पण या दोन तासात जवळपास 12 मिनिटांचा सर्वात शुभ मुहूर्त आहे. हा मुहूर्त 6 वाजून 4 मिनिटांनी सुरु होईल आणि 6 वाजून 16 मिनिटांनी संपेल. त्यामुळे सर्व पूजेची तयारी आधीच करून या मुहूर्तावर पूजन करावं. दुसरीकडे या दिवशी शुक्रवार असून स्वाती नक्षत्र पडत आहे. त्यामुळे देवी लक्ष्मीसोबत शुक्राचा प्रभाव असणार आहे. शुक्र हा ग्रह भौतिक सुखांचा कारक आहे. त्यामुळे या दिवसाचं महत्त्व आणखी वाढते.

देवी लक्ष्मीला या काळात त्यांच्या प्रिय वस्तू अर्पण केल्या तर त्याची शुभ फळं मिळतात असं ज्योतिषशास्त्रात सांगितलं गेलं आहे. देवी लक्ष्मीला कमळाची फुलं, कमळ बिया, बताशा, खीर आणि गुलाबाचं अत्तर अतिशय प्रिय आहे.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
नवाब मलिक यांना सर्वात मोठा धक्का, अजितदादा गटाचा मोठा निर्णय काय?
नवाब मलिक यांना सर्वात मोठा धक्का, अजितदादा गटाचा मोठा निर्णय काय?.
अमित शाहांना वेगळंच टेन्शन, भाजप नेत्यांना काय केल्या थेट सूचना?
अमित शाहांना वेगळंच टेन्शन, भाजप नेत्यांना काय केल्या थेट सूचना?.
राष्ट्रवादीच्या पक्ष-चिन्हाची 6 नोव्हेंबरला सुनावणी, कोर्टात काय घडलं?
राष्ट्रवादीच्या पक्ष-चिन्हाची 6 नोव्हेंबरला सुनावणी, कोर्टात काय घडलं?.
विधानसभेच्या रिंगणात उतरताच रोहित पाटलांच तुफान भाषण, आबांची आठवण अन्
विधानसभेच्या रिंगणात उतरताच रोहित पाटलांच तुफान भाषण, आबांची आठवण अन्.
महायुतीच्या 18 जागांचा पेच शाहांच्या दरबारी सुटणार? CM आणि DCM दिल्लीत
महायुतीच्या 18 जागांचा पेच शाहांच्या दरबारी सुटणार? CM आणि DCM दिल्लीत.
धनंजय मुंडे परळीतून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर म्हणाले, 'आज माझी बहीण..'
धनंजय मुंडे परळीतून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर म्हणाले, 'आज माझी बहीण..'.
10 मिनिटांत कार्यक्रम.. जरांगेंच्या जीवाला धोका, बिश्नोई गँगकडून धमकी?
10 मिनिटांत कार्यक्रम.. जरांगेंच्या जीवाला धोका, बिश्नोई गँगकडून धमकी?.
यशोमती ठाकूर यांची बाईक रॅली, अर्ज दाखल करताना जोरदार शक्तिप्रदर्शन
यशोमती ठाकूर यांची बाईक रॅली, अर्ज दाखल करताना जोरदार शक्तिप्रदर्शन.
रोहित पवारांचा मोठा दावा, 'महायुती एका मतदारसंघात 30-40 कोटी रूपये...'
रोहित पवारांचा मोठा दावा, 'महायुती एका मतदारसंघात 30-40 कोटी रूपये...'.
शंभूराज देसाईंना शिवसेनेकडून तिकीट तर मविआकडून 'हा' नेता अपक्ष लढणार?
शंभूराज देसाईंना शिवसेनेकडून तिकीट तर मविआकडून 'हा' नेता अपक्ष लढणार?.