Diwali 2022: दिवाळीत सोनं खरेदी करताना या गोष्टी ठेवा ध्यानात, होणार नाही फसवणूक

दिवाळीत सोनं खरेदी करणं शुभ मानल्या जाते. सोन्याच्या खरेदीत फसवणूक होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते. ही फसवणूक कशी टाळता येईल जाणून घेऊया.

Diwali 2022: दिवाळीत सोनं खरेदी करताना या गोष्टी ठेवा ध्यानात, होणार नाही फसवणूक
सोने खरेदी Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Oct 23, 2022 | 10:39 PM

मुंबई, दिवाळीच्या (Diwali 2022) निमित्ताने अनेकजण सोने खरेदी (Gold Purchasing In Diwali) करतात. सोने हे संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक आहे. ही एक दीर्घकालीन मालमत्ता देखील आहे ज्याचे प्रतिकूल परिस्थितीत पैशांमध्ये देखील रूपांतर केले जाऊ शकते. धनत्रयोदशी आणि दिवाळी हे भारतातील सोने खरेदीचे सर्वात शुभ सण मानले जातात. तथापि, काही ग्राहकांना काही सोने विक्रेत्यांकडून त्यादिवशीचा दर, मेकिंग चार्जेस, जीएसटी  इत्यादींबद्दल चुकीचे वर्णन केले जाऊ शकते. त्यामुळे सोने खरेदीच्या उत्साहात फसवणूक होऊ याचे भान ठेवणे आवश्यक आहे. सोनं खरेदी करताना या  5 गोष्टी लक्षात ठेवा ज्यामुळे तुमची फसवणूक होणार नाही.

नेहमी प्रमाणित सोने खरेदी करा

तुम्ही फक्त ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्कने प्रमाणित केलेले सोने खरेदी करावे. हे सोन्याची शुद्धता आणि उच्च दर्जाची खात्री देते. हॉलमार्क व्यतिरिक्त, तुम्ही शुद्धता कोड, चाचणी केंद्र चिन्ह, ज्वेलर्स मार्क आणि मार्किंगचे वर्ष देखील विचारात घेतले पाहिजे.

हे सुद्धा वाचा

सोन्याची किंमत क्रॉस-चेक करा

सोन्याचे दर वेळोवेळी बदलत असल्याने तुम्ही नेहमी क्रॉस-चेक करावे.  तुम्ही सोनं किती कॅरेटचे खरेदी करता यावरही किंमत अवलंबून असते. वजनाच्या तुलनेने सोन्याच्या भावाचा साहेब करा. त्यावर असलेले मेकिंग चर्चेस विचारा.

कार्ड, युपीआय किंवा नेट बँकिंगने व्यवहार करा

सोने खरेदी करणाऱ्यांनी बँकिंग चॅनेल, UPI द्वारे समर्थित डिजिटल पेमेंट ॲप्सद्वारे पैसे द्यावे आणि रोख पेमेंट टाळावे. तुम्हाला तुमच्या खरेदीसाठी एक मर्चंड कॉपी देखील मिळायला हवी. जर तुम्ही सोनं ऑनलाइन खरेदीच्या करीत असाल तर, डिलिव्हरी पॅकेजमध्ये छेडछाड झालेली नाही ना याची खात्री करणे आवश्यक आहे.

केवळ विश्वसनीय विक्रेत्यांकडूनच खरेदी करा

सोने खरेदी करण्यापूर्वी, आपण विक्रेत्याची विश्वसनीयता देखील तपासली पाहिजे. स्वतःत खरेदी करण्याच्या नादात फसवणूक होण्याची शक्यता आहे. याशिवाय सोन्याच्या बदल्यात सोनं घेत असल्यास आधीच्या सोन्याची किंमत कशा प्रकारे लावली हे सोनाराला नक्की विचारा.

री-सेल व्हॅल्यू, बाय-बॅक पॉलिसी तपासा

तुम्ही सोन्याचे पुनर्विक्रीचे मूल्य म्हणजेच री-सेल व्हॅल्यू विक्रेत्याला नक्की विचारा तसेच विक्रेत्याच्या बाय-बॅक पॉलिसीबद्दल जाणून घ्या. काही विक्रेते तुमच्या दागिन्यांची पुनर्विक्री करताना सोन्याच्या मूल्यातून काही टक्के वजा करतात तर काही सध्याच्या दराचा विचार करू शकतात. सोनं खरेदी करताना या गोष्टी तपासून घेतल्यास कधीच फसवणूक होणार नाही.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.