Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Navratri 2022 : नवरात्रीत असा करा हवन, जाणून घ्या शुभ वेळ आणि साहित्य

हिंदू धर्मात होमहवन (Home hawan) आणि यज्ञाला विशेष महत्त्व आहे ( Havan). हवन केल्याने सकारात्मक शक्तीचा निर्माण होतो. अनेक अभ्यासांमध्ये हे स्पष्ट झाले आहे की, हवन केल्याने प्रदूषणमुक्त वातावरण मिळते.

Navratri 2022 : नवरात्रीत असा करा हवन, जाणून घ्या शुभ वेळ आणि साहित्य
hawan
Follow us
| Updated on: Apr 10, 2022 | 6:00 AM

मुंबई : हिंदू धर्मात होमहवन (Home hawan) आणि यज्ञाला विशेष महत्त्व आहे ( Havan). हवन केल्याने सकारात्मक शक्तीचा निर्माण होतो. अनेक अभ्यासांमध्ये हे स्पष्ट झाले आहे की, हवन केल्याने प्रदूषणमुक्त वातावरण मिळते. यामुळे आपले आरोग्य सुधारते. धार्मिक शास्त्रानुसार, वाईट घटनांना टाळण्यासाठी किंवा इच्छा पूर्ण करण्यासाठी हवन केले जात असत. हवनमध्ये, बेलपत्र (Belpatra), कडुलिंब, कलिंगज, आंब्याचे लाकूड, पिंपळाची साल, पलाशचे रोप, देवदार वृक्षाचे खोड, बोर, कापूर, साखर, जव, तांदूळ, चंदनाचे लाकूड इत्यादी सामुग्रीला अग्नित टाकले जाते. यामधून निघणाऱ्या धुराने वातावरण शुद्ध होते. हे सर्व घटक आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. शास्त्रज्ञांच्या मते, हवनात शेणाच्या गोवऱ्यांचा वापर होतो, ज्यामुळे 94 टक्के बॅक्टेरिया नष्ट होतात. याशिवाय हवन केल्याने अनेक आजारांपासून मुक्तता मिळते. नवरात्रीमध्ये, देवी मातेचे भक्त नऊ दिवस दुर्गा देवीच्या विविध रूपांची पूजा करतात आणि नवमी तिथीला हवनाने पूजा पूर्ण करतात. हवनानंतरच नऊ दिवसांची पूजा पूर्ण होते, असा समज आहे. यावेळी चैत्र नवरात्रीची नवमी तिथी 10 एप्रिल रोजी येत आहे. हवनाची शुभ वेळ, पद्धत आणि साहित्य याबद्दल जाणून घेऊया.

हवनासाठी शुभ मुहूर्त

पंचांगानुसार चैत्र नवरात्रीची नवमी तिथी शनिवार, 9 एप्रिल रोजी दुपारी 1.23 पासून सुरू होईल. दुसरीकडे, नवमी तिथी 11 एप्रिल रोजी पहाटे 3.15 वाजता समाप्त होईल. याशिवाय अनेक शुभ योगही या दिवशी बनत आहेत. खरं तर, 10 एप्रिल रोजी सकाळी 4.31 ते 6.01 या वेळेत रवि योग असेल. यानंतर सुकर्म योग आणि रविपुष्य योग, सर्वार्थ सिद्धी योग रात्री १२.०४ पर्यंत दिवसभर राहील. अशा स्थितीत दिवसभरात कधीही हवन करता येते.

हवन साहित्य

हवनकुंड, आंब्याचे लाकूड, तांदूळ, काळे तीळ, जव, साखर, गाईचे तूप, सुपारी, सुके खोबरे, कालव, लवंग, वेलची, कापूर,

ग्रहदोषातून मुक्तता मिळते

जर तुमच्या जीवनात ग्रहदोषांची समस्या असेल, तर तुम्ही हवन केले पाहिजे. हवन केल्याने ग्रहांची स्थिती शांत होते. ग्रहांशी संबंधित असलेल्या दिवशी संकल्प करुन अकरा किंवा एकवीस दिवस उपवास ठेवून पूर्णाहुती अर्पण केल्याने सर्व दुःख दूर होतात. हवन केल्यानंतर ब्राह्मणांना जेवायला द्या. यानंतर पैसे आणि कपड्यांचे दान करा.

संबंधीत बातम्या

aharashtra Corona Update : सांताक्रुझमध्ये आढळला कोरोनाच्या XE व्हेरिएंटचा पहिला रुग्ण, आरोग्यमंत्र्यांची माहिती, खबरदारीच्या केंद्राच्या सूचना

Gunratna Sadavarte: सुरक्षेत चूक ठेवणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करणार; दिलीप वळसे पाटील यांची माहिती

Jalgaon Murder : जळगावमध्ये दगडाने ठेचून एकाची हत्या, गेल्या पंधरवड्यातील चौथी घटना

संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार.
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब.
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड.
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा.
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?.
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत.
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप.
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स.
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्..
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्...
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला.