Surya | भगवान सूर्याला अर्घ्य देताना या चुका करणे टाळा, अन्यथा विपरीत परिणाम भोगावे लागणार…

रविवारचा दिवस हा भगवान सूर्याला समर्पित असतो (Offering Water To Sun). या दिवशी विधीवत भगवान सूर्याची पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात.

Surya | भगवान सूर्याला अर्घ्य देताना या चुका करणे टाळा, अन्यथा विपरीत परिणाम भोगावे लागणार...
Surya Arghya
Follow us
| Updated on: Jun 06, 2021 | 8:15 AM

मुंबई : आज रविवार आहे. रविवारचा दिवस हा भगवान सूर्याला समर्पित असतो (Offering Water To Sun). या दिवशी विधीवत भगवान सूर्याची पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात. सूर्य मंत्राचा जप केल्याने जन्मकुंडलीतील सूर्याची स्थिती बळकट होते. या दिवशी पूजा-अर्चना केल्याने एखाद्या व्यक्तीला अनेक दुःखातून मुक्तता मिळते. मान्यता आहे की, भगवान सूर्याची पूजा केल्याने घरात यश, सुख, समृद्धी आणि संपत्ती येते. परंतु तुम्हाला माहिती आहे काय की भगवान सूर्यला अर्घ्य अर्पण करताना काय सावधगिरी बाळगली पाहिजे (Do Not Do These Mistakes While Offering Water To Sun).

? भगवान सूर्याला अर्घ्य अर्पण करण्याचे हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. ही परंपरा वर्षानुवर्षे सुरु आहे. सकाळी स्नान केल्यानंतर भक्त सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करतात आणि प्रार्थना करतात.

? सूर्यदेवाला नेहमी तांब्याच्या कलशातून अर्घ्य द्या. भगवान सूर्यला कधीही स्टील, प्लास्टिक किंवा काचेच्या बाटलीतून अर्घ्य अर्पण करु नये.

? अर्घ्य अर्पण करताना भांडे दोन्ही हातांनी धरुन डोक्याच्या वर पकडून जल अर्पण करावे. यामुळे सूर्याची किरणे डोक्यावर पडतात.

? भगवान सूर्याला अर्घ्य अर्पण करताना कलशात अक्षता आणि लाल फुले ठेवणे शुभ मानले जाते. मान्यता आहे की जल अर्पण करताना त्याचे शिंतोडे तुमच्या पायावर पडल्यास तुमची पूजा अपूर्ण मानली जाते.

? सूर्यदेवाला अर्घ्य देताना आपला चेहरा पूर्व दिशेने असावा.

? तांब्याचा कलश दोन्ही हातांनी धरुन ठेवा आणि नंतर भगवान सूर्याला जल अर्पण करा.

? हे लक्षात ठेवावे की अर्घ्य देताना सूर्याची किरणे त्या प्रवाहात दिसतील. यामुळे नवग्रह मजबूत होतात.

? सूर्य देवाला अर्घ्य देताना सूर्यमंत्रांचा जप करावा.

स्मरामि खलु तत्सवितुर्वरेण्यम् रूपं हि मण्डलमृचोथ तनुर्यजूंषि। सामानि यस्य किरणा: प्रभवादिहेतुं ब्रह्माहरात्मकमलक्ष्यमचिन्त्यरूपम्।।

सूर्याला दररोज अर्घ्य करण्याचे फायदे –

भगवान सूर्याला जल अर्पण केल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते. मान्यता आहे की भगवान सूर्याला अर्घ्य अर्पण करताना पाण्याचा प्रवाह आणि त्यावर पडणारी किरणे पाहून मनात सकारात्मक ऊर्जा संचाकते. धर्मग्रंथानुसार दररोज भगवान सूर्याला अर्घ्य अर्पण केल्याने कुटुंबातील सदस्य निरोगी राहतात. या व्यतिरिक्त, कुंडलीतील सूर्य दोषांशी संबंधित समस्या दूर केल्या होतात.

Do Not Do These Mistakes While Offering Water To Sun

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

‘या’ ग्रहाच्या अशुभ स्थितीची रिलेशनशिपवर वक्रदृष्टी, घटस्फोटापर्यंत जाऊ शकतं प्रकरण!

Jyeshtha Amavasya 2021: कधी आहे ज्येष्ठ अमावस्या? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पुजा विधी आणि महत्व

Shani Jayanti 2021 | शनि जयंती कधी आहे? जाणून घ्या या दिवसाचं महत्त्व आणि शुभ मुहूर्त

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.