Holashtak 2021 | होलाष्टकादरम्यान चुकूनही करु नका ‘ही’ कामं…

हिंदू पंचांगानुसार होळीचा सण हा फाल्गुन महिन्याच्या पोर्णिमेला दरवर्षी मोठ्या (Do Not Do These Things During Holashtaka) उत्साहात साजरा केला जातो.

Holashtak 2021 | होलाष्टकादरम्यान चुकूनही करु नका 'ही' कामं...
Holashtak
Follow us
| Updated on: Mar 22, 2021 | 3:42 PM

मुंबई : हिंदू पंचांगानुसार होळीचा सण हा फाल्गुन महिन्याच्या पोर्णिमेला दरवर्षी मोठ्या (Do Not Do These Things During Holashtaka) उत्साहात साजरा केला जातो. पोर्णिमेच्या रात्री होलिका दहन केलं जातं आणि दुसऱ्या दिवशी धुलिवंदन असतं. यावर्षी 28 मार्चला होलिका दहन केलं जाईल तर 29 मार्चला सकाळी धुलिवंदन असेल (Do Not Do These Things During Holashtaka).

‘होलाष्टक’ म्हणजे काय?

होळी आणि अष्टक या दोन शब्दापासून ‘होलाष्टक’ हा शब्द तयार झाला आहे. म्हणजेच होळीच्या आठ दिवस आधीच्या काळाला ‘होलाष्टक’ असे म्हणतात. या वेळी होलाष्टक 22 मार्च म्हणजेच आजपासून सुरु होईल आणि 28 मार्चपर्यंत राहील. यानंतर 28 मार्च 2021 ला होलिका दहन आणि 29 मार्च 2021 ला होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हिंदू धर्मग्रंथांनुसार, होलाष्टक दरम्यान नवीन घरात प्रवेश, लग्न, दाढी करणे, मुंडण करणे इत्यादी शुभ क्रिया करण्यास मनाई आहे.

होलाष्टकात शुभ कार्य करणे का वर्जित?

हिंदू धर्मग्रंथांनुसार, होलाष्टक दरम्यान शुभ कार्य करणे अशुभ मानलं जातं. असं यासाठी कारण अष्टमी तिथीला कामदेवाने भगवान शिवची तपस्या भंग करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर भगवान शिव यांनी कामदेवाला भस्म केलं होतं. कामदेवला प्रेमाचा देवता मानलं जातं त्यामुळे त्यांच्या मृत्यूने तिन्ही लोकात शोक पसरला. त्यानंतर कामदेवची पत्नी रतीने भगवान शिव यांच्याकडे क्षमा मागीतली होती आणि शिवने कामदेव यांना पुन्हा जीवित करण्याचं आश्वासन दिलं होतं.

होलाष्टक दरम्यान चुकूनही ही कामं करु नये –

1. होलाष्टक दरम्यान लग्न, भूमीपूजन, गृह प्रवेश, मंगलकार्य, नवा व्यवसाय आणि नवीन काम करु नये.

2. त्याशिवाय, कुठल्याही प्रकारचं यज्ञ, हवन करु नये. या दिवसांमध्ये नवविवाहितेने तिच्या माहेरी जाऊ नये.

3. शास्त्रांनुसार, असं मानलं जातं की ज्या भागात होलिकेसाठी लाकूड कापले जाते तिथे होलिका दहनपर्यंत कोणतेही शुभ कार्य होत नाही.

4. शास्त्रांनुसार होलाष्टक दरम्यान 16 संस्कार, जसे विवाह संस्कार, मुंडण संस्कार, नामकरण संस्कार सारखी कार्यही करु नये.

वैज्ञानिक महत्व काय?

वैज्ञानिकांनुसार, या दिवसात हवामानातील बदलामुळे मन अस्वस्थ, उदास आणि चंचल राहते. मन नसेल तेव्हा केलेल्या कामात कधीही यश मिळत नाही. म्हणून, यावेळी बाहेर फिरायला पाहिजे. होळीच्या पवित्र सणात रंग खेळल्याने तुमचे मन शांत आणि आनंदित होते.

होलाष्टकसंबंधीची आख्यायिका

असे म्हटले जाते की, हिरण्यकश्यपने आपल्या मुलाच्या हत्येच्या उद्देशाने त्याचा आठ दिवस अनन्वित छळ केला. परंतु, भगवान विष्णूची भक्त प्रल्हादवर इतकी कृपा होती की, प्रत्येक वेळी त्याचा या संकटातून बचाव झाला. आठव्या दिवशी प्रल्हादची आत्या होलिका ही तिच्या मांडीवर प्रल्हादला घेऊन अग्नीत बसण्याचं ठरलं.

होलिकेला अग्नी देवाने न जळण्याचा आशीर्वाद दिला होता. परंतु, भगवान विष्णूच्या कृपेने प्रल्हादचे प्राण पुन्हा वाचले आणि होलिका त्या अग्नीत जळून भस्मसात झाली. तेव्हापासून दरवर्षी होळीच्या आठ दिवस आधी होलाष्टकच्या वेळेस कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. पण होलिका दहन झाल्यावर अर्थात वाईटावर चांगल्याने विजय मिळवल्याचा आनंद साजरा केला जातो.

Do Not Do These Things During Holashtaka

संबंधित बातम्या :

Holashtak and Holi 2021 | का साजरी केली जाते होळी? जाणून घ्या होलाष्टक ते होळीपर्यंतची संपूर्ण माहिती

Holashtak 2021 : ‘होलाष्टक’ला आजपासून सुरुवात, हे उपाय करा, दूर होतील सर्व संकट…

'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...