Solar Eclipse : सूर्यग्रहण काळात बिल्कूल करू नका ही कामं, कुणी काय करावं? ?, मान्यता काय ?

Solar Eclipse : हिंदू धर्मात, सूर्यग्रहणाच्या वेळी लोकांना काही गोष्टी करण्यास मनाई आहे. ग्रहणाच्या काळात या गोष्टी केल्याने लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते आणि आयुष्यात संकटं येतात असे मानले जाते. सूर्यग्रहण काळात कोणती कामे करू नयेत, हे जाणून घेऊया.

Solar Eclipse :  सूर्यग्रहण काळात बिल्कूल करू नका ही कामं, कुणी काय करावं? ?, मान्यता काय ?
सूर्यग्रहण काळात ही कामं बिल्कूल करू नका
Follow us
| Updated on: Apr 02, 2024 | 11:48 AM

2024 सालचं पहिलं सूर्यग्रहण हे 8 एप्रिल रोजी लागणार आहे. 8 एप्रिलला चैत्र महिन्यातील अमावस्येच्या दिवशी संपूर्ण सूर्यग्रहण होईल. हे सूर्यग्रहण अत्यंत खास असून तब्बल 50 वर्षांनंतर हे सूर्यग्रहण होत आहे. सूर्यग्रहणाच्या 12 तास आधी सुतक कालावधी सुरू होणार आहे. सूर्यग्रहण काळात लोकांनी अनेक गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. विशेषत: गर्भवती महिलांनी काही गोष्टी चुकूनही करू नयेत. तसेच ग्रहणकाळात येणाऱ्या सुतक काळाकडेही विशेष लक्ष द्यावे लागते.

या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण हे 8 एप्रिल रोजी रात्री 9:12 वाजता सुरू होईल आणि 9 एप्रिल रोजी दुपारी 2:22 वाजता संपेल. धार्मिक मान्यतेनुसार, ग्रहणाचा सुतक कालावधी 12 तास किंवा 9 तास आधी सुरू होतो, ज्यामध्ये सूर्यग्रहणाचा सुतक कालावधी ग्रहणाच्या वेळेच्या 12 तास आधी सुरू होतो. सुतक काळ हा एक प्रकारे अशुभ काळ मानला जातो. त्यामुळे सुतक काळात कोणतेही शुभ किंवा मंगल कार्य केले जात नाही.

कुठे कुठे दिसणार वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण ?

2024 या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण हे कॅनडा, मेक्सिको, युनायटेड स्टेट्स, अरुबा, बर्म्युडा, कॅरिबियन नेदरलँड, कोलंबिया, कोस्टा रिका, क्युबा, डोमिनिका, ग्रीनलँड, आयर्लंड, आइसलँड, जमैका, नॉर्वे, पनामा, निकाराग्वा, रशिया, पोर्तो रिको, सेंट मार्टिन, स्पेन, बहामास, युनायटेड किंगडम आणि व्हेनेझुएलासह जगाच्या काही भागांमध्ये दृश्यमान असेल.

ग्रहणाच्या काळात ही कामं करू नका

– सूर्यग्रहणाच्या वेळी लोकांनी घराबाहेर पडू नये तसेच ग्रहणाकडे थेट डोळ्यांनी पाहू नये.

– ग्रहणाच्या काळात स्वयंपाकघरातील कोणतीही कामं करू नयेत. विशेषतः अन्न शिजवू नये.

– ग्रहणकाळात गरोदर महिलांनी घराबाहेर अजिबात जाऊ नये. तसेच सुईत दोराही ओवू नये.

– सूर्यग्रहण काळात काहीही चिरू नका, सोलू नका.

– ग्रहणकाळात कोणाला दुखवू नका किंवा गरीब व्यक्तीला त्रास देऊ नका किंवा कोणाचाही अपमान करू नका.

– ग्रहणकाळात घरात कोणाशीही वाद घालू नका, कारण ग्रहणकाळात वादविवाद केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळत नाही.

– ग्रहण काळात देवघरात ठेवलेल्या मूर्तींना हात लावू नका किंवा पूजा करू नका.

– ग्रहणाच्या वेळी सूर्यदेवाचे ध्यान करताना त्यांच्या मंत्रांचा उच्च स्वरात जप करावा. हा मंत्र पुढीलप्रमाणे आहे – ‘ॐ ह्रां ह्रीं ह्रौं स: सूर्याय नम:’।

सुतक काळ

हिंदू धर्मात ग्रहणाचा सुतक काळ हा अशुभ किंवा दूषित काळ मानला जातो. सुतक काळात देवाची पूजा केली जात नाही. तसेच कोणतेही मंगळ अथवा शुभ कार्य केले जात नाही. याशिवाय मंदिरांचे दरवाजेही बंद असतात. एवढेच नाही तर सुतक काळात खाणे, पिणेही निषिद्ध मानले जाते. सुतक कालावधी सूर्यग्रहणाच्या १२ तास आधी सुरू होतो आणि ग्रहण संपल्यानंतर सुतक कालावधीही संपतो.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.