मकर संक्रांतीच्या दिवशी ‘हे’ काम करायला विसरू नका, होऊ शकतं मोठं नुकसान

अनेकदा आपण सणाच्या दिवशी किंवा कोणत्याही शुभ दिवशी अशा काही चुका करतो. ज्याचा परिणाम तुमच्यावर किंवा तुमच्या कामांवर होत असतो. तसेच या चुकांमुळे तुम्हाला भविष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. जाणून घेऊया मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या गोष्टी करू नये.

मकर संक्रांतीच्या दिवशी 'हे' काम करायला विसरू नका, होऊ शकतं मोठं नुकसान
Makar Sankranti 2025 Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 13, 2025 | 8:10 AM

हिंदू धर्मात मकर संक्रांतीचा सण खूप खास मानला जातो. सूर्य देव मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा सण साजरा केला जातो. १४ जानेवारीला संपूर्ण देशभरात मकरसंक्रांत सण साजरा केला जाणार आहे. त्याचबरोबर मकर संक्रांतीपासून शुभ कामांनाही सुरुवात होते. परंतु मकर संक्रांतीच्या दिवशी काही गोष्टी विसरता कामा नयेत. जर चुकून एखादी गोष्ट केली तर अश्याने घरात नकारात्मक ऊर्जेचा संचार होईल, असे मानले जाते. याशिवाय जीवनात अडचणी वाढू शकतात.

मकर संक्रांत तिथी

वैदिक दिनदर्शिकेनुसार मंगळवार 14 जानेवारी रोजी मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाईल, या दिवशी सूर्य देव सकाळी 9.03 वाजता धनु राशीतून बाहेर येऊन मकर राशीत प्रवेश करतील.

मकर संक्रांतीच्या दिवशी या गोष्टी चुकूनही करू नये?

मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही आंघोळ केल्याशिवाय अन्नाचे सेवन करू नका. चुकूनही तुम्ही असे केल्यास सेवन केले अन्न अशुद्ध व विषारी बनते, असे मानले जाते.

मकर संक्रांतीच्या दिवशी नदीवर जाऊन स्नान करणे व दान करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे, परंतु या दिवशी विसरूनही तेलाचे दान करू नये. मकर संक्रांतीच्या दिवशी तेलदान करणे अशुभ मानले जाते. असे केल्याने घरात आजार आणि नकारात्मकता येते, तसेच मकर संक्रांतीला पांढरा तांदूळ आणि चाकू, कात्री इत्यादी धारदार वस्तूंचे दान करणे टाळावे.

ज्योतिषशास्त्रानुसार मकर संक्रांतीला एक पर्व म्हंटल आहे. त्यामुळे धार्मिक दृष्ट्या मकर संक्रांतीचे विशेष महत्व आहे. त्यामुळे या दिवशी मांसाहार खाऊ नये. तसेच मद्यपान करणे टाळावे. जर या दिवशी या गोष्टींचे पालन केले नाही तर तुमच्या आयुष्यात नकारात्मकता येते आणि आरोग्यावरही वाईट परिणाम होतो.

मकर संक्रांतीच्या दिवशी दारात येणाऱ्या कोणत्याही ब्राह्मण आणि गरजू व्यक्तीला रिकामे हात पाठवू नका काहींना काही दान करावे. याशिवाय कोणत्याही व्यक्तीचा अपमान करू नका. तुम्ही जर या दिवशी या गोष्टी न केल्यास व्यक्ती पापाचा भागीदार बनू शकते, असे मानले जाते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

निवडणुकीवेळी मायेचा उमाळा, आता 'त्या' बहिणींकडून दंडासह वसुली होणार
निवडणुकीवेळी मायेचा उमाळा, आता 'त्या' बहिणींकडून दंडासह वसुली होणार.
अजित पवार काय पोलीस ऑफिसर आहेत का? शिवतारांचे सवाल अन् दादा भडकले
अजित पवार काय पोलीस ऑफिसर आहेत का? शिवतारांचे सवाल अन् दादा भडकले.
श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला
श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला.
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा.
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?.
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल.
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा.
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल.
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला.
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात.