Vastu Shastra : घराच्या या दिशेला चुकूनही लावू नका घड्याळ आणि आरसा, वास्तुशास्त्राचा नियम जाणून घ्या
वास्तुशास्त्रात प्रत्येक वस्तुंचे नियम आणि ठेवण्याचे ठिकाण ठरवले आहेत. त्यानुसार घरातील वस्तुंची मांडणी केली आहे. आपल्या घरात घड्याळ आणि आरसा हे प्रमुख वस्तुपैकी एक आहे आणि आपल्याला त्याची गरज असते. पण या वस्तु वास्तुशास्त्रानुसार कुठे असाव्यात याचे नियम सांगितले गेले आहेत.
आपल्या घरात घड्याळ आणि आरसा हे प्रमुख वस्तुंपैकी आहे. प्रत्येक घरात या दोन वस्तू असतात. आपआपल्या ऐपतीप्रमाणे लोकं या वस्तू आपल्या घरात ठेवतात. पण या दोन्ही वस्तुंसाठी वस्तुशास्त्रात नियम सांगितला गेला आहे. जर या दोन्ही चुकीच्या ठिकाणी असतील तर घरात नकारात्मक उर्जेचा वास राहतो. घरातील आर्थिक स्थिती बिघडते. इतकंच काय तर देवी लक्ष्मीचा अवकृपा होते, असं वास्तुशास्त्र सांगतं. त्यामुळे या दोन्ही वस्तू घरात योग्य ठिकाणी असणं गरजेचं आहे. आरशाबाबत सांगायचं तर, आरसा कायम पूर्व किंवा उत्तर दिशेला असणं शुभ मानलं जातं. घरात या दिशेला आरसा असणं शुभ मानलं जातं. कारण उत्तर ही कुबेराची दिशा आहे. या दिशेला आरसा असल्यास घरात शांतता प्रस्थापित होते. तसेच आर्थिक मार्ग खुले होतात. पण हाच आरसा दक्षिण, पश्चिम, आग्नेय, वायव्य आणि नैऋत्य दिशेस असेल तर चालणार नाही. जर या ठिकाणी तुमचा आरसा असल्यात तात्काळ काढून घ्या. कारण या दिशा आरशासाठी नाहीत. आरसा या ठिकाणी असल्यास नकारात्मक उर्जेचा वास राहतो.तसेच वास्तुदोषामुळे आर्थिक स्थितीही खालावते.
आरशाप्रमाणे घड्याळाची दिशाही ठरवून दिलेली आहे. वास्तुशास्त्रानुसार घड्याळ कायम उत्तर किंवा पूर्व दिशेला लावलं पाहीजे. कारण उत्तर दिशेवर धनदेवता कुबेराचं राज्य आहे. तर सर्व देवता या पूर्व दिशेला विराजमान आहेत. त्यामुळे या दोन्ही दिशा शुभ मानल्या जातात. या दोन ठिकाणी घड्याळ असल्यास त्याचे सकारात्मक परिणा मिळतात. जीवनात सुख समृद्धी राहते. तसेच उत्पन्नाचे नवे स्त्रोत खुले होतात.
घराच्या दक्षिण दिशेला चुकूनही घड्याळ लावू नये. कारण ही यमाची दिशा आहे. या ठिकाणी घड्याळ असल्यास घरात कायम आजारपण आणि आर्थिक स्थिती ढासळल्याचं पाहायला मिळतं. जर तुमच्या घरात या ठिकाणी घड्याळ असेल तर ते काढा आणि पूर्वी किंवा उत्तर दिशेला लावा.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)