नव्या घरात प्रवेश करण्यापूर्वी या गोष्टी कराच, आयुष्यात कधीच येणार नाहीत आर्थिक संकट
हिंदू धर्म शास्त्रानुसार घरात राहायला जाण्यापूर्वी जी पूजा केली जाते, तिलाच गृह प्रवेश असं देखील म्हणतात. गृह प्रवेशामुळे घरातील वाईट आणि नकारात्मक शक्तींचा नाश होतो.
प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपलंही घर असावं,अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन मानवाच्या मुलभूत गरजा आहेत. हिंदू धर्म शास्त्रानुसार नव्या घरात प्रवेश करण्यापूर्वी पूजा करणं शुभ मानलं जातं. जर तुम्ही नव्या घरात प्रवेश करण्यापूर्वी पूजा केली तर वास्तु दोषापासून देखील मुक्ती मिळते. नव्या घरात कधीही पूजा न करता राहायला जाऊ नये अशी हिंदू धर्म शास्त्रामध्ये मान्यता आहे.
हिंदू धर्म शास्त्रानुसार घरात राहायला जाण्यापूर्वी जी पूजा केली जाते, तिलाच गृह प्रवेश असं देखील म्हणतात. गृह प्रवेशामुळे घरातील वाईट आणि नकारात्मक शक्ती नष्ट होतात.घरात सकारात्मक ऊर्जा राहाते. सुख, समुद्धी येते. पैशांची कमतरता भासत नाही. मात्र पूजा न करता जर तुम्ही घरात राहायला गेलात तर ते धर्म शास्त्रानुसार अशुभ मानलं जातं, तुमच्या घरात सदैव नकारात्मक उर्जेचा वास राहातो. दरम्यान नव्या घरात राहायला जाण्यापूर्वी तुम्ही जी पूजा करणार आहात त्यासाठी काही गोष्टींची खबरदारी घ्यावी लागते. त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
नव्या घरात प्रवेश करण्यापूर्वी या गोष्टी करा
तुम्ही जर नव्या घरात प्रवेश करणार असाल तर त्यासाठी शुभ महिना, दिवस आणि तिथीची निवड करा
नव्या घरात प्रवेश करण्यापूर्वी घरात आधी गणपतीच्या मूर्तीची स्थापना करा, सोबत घराची वास्तू शांती देखील करा.
नव्या घरात प्रवेश करण्यासाठी तुमचा डावा पाय आधी घराच्या उंबऱ्यावर ठेवा, आणि त्यानंतरच घरात प्रवेश करा . ज्या दिवशी पूजा झाली आहे, त्या दिवशी पूजेसाठी आलेल्या नातेवाईकांना घरीच मुक्कामी ठेवा. पूजेनंतर घराच्या बाहेर पडणे अशुभ मानलं जातं.
घराचा जो मालक आहे, त्याने पूजेनंतर एकदा सर्व घरात चक्कर मारावी.
घरातील जी महिला आहे, जिने पूजेसाठी कलश हातात घेतला होता, त्या महिलेने तो कलश घेऊन संपूर्ण घर फिरावे. तो कलश पाणी किंवा दुधाने भरलेला असावा. तसेच तुमच्या कुलदेवतेचे किंवा इष्ट देवतेचा नाम जप करावा.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)