Akshaya Tritiya 2021 | अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ही कामं नक्की करा, देवी लक्ष्मी प्रसन्न होईल
अक्षय्य तृतीयेचा दिवस धर्माच्या अत्यंत शुभ मानला जातो (Akshaya Tritiya 2021). असे मानले जाते की या दिवशी केलेले पुण्य कधीच क्षीण होत नाही. दरवर्षी अक्षय्य तृतीया वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्ष तृतीयावर होते.
मुंबई : अक्षय्य तृतीयेचा दिवस धर्माच्या अत्यंत शुभ मानला जातो (Akshaya Tritiya 2021). असे मानले जाते की या दिवशी केलेले पुण्य कधीच क्षीण होत नाही. दरवर्षी अक्षय्य तृतीया वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्ष तृतीयावर होते. यावेळी तृतीया तिथी 14 मे रोजी येत आहेत. दान-पुण्य याशिवाय लोक या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करतात, सोने-चांदी खरेदी करतात (Do These Things On Akshaya Tritiya 2021 For Prosperity And Know The Shubh Muhurat).
अक्षय्य तृतीयेबद्दल असे मानले जाते की, सत्ययुग आणि त्रेतायुग या दिवसापासून सुरु झाले होते. त्याच वेळी, द्वापारयुग देखील या दिवशी संपन्न झाला. अशा प्रकारे, हा दिवस धार्मिक दृष्टीने अतिशय पवित्र आणि पुण्यदायी मानला जातो. जर तुम्हालाही आपल्या घरात समृद्धी हवी असेल आणि आई लक्ष्मीची कृपा ठेवायची असेल तर अक्षय्य तृतीयेच्या दिवशी काही काम निश्चितपणे करावी. त्याबाबत जाणून घेऊ
देवी लक्ष्मीसह नारायणाची पूजा करा
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी समृद्धीची देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. पूजेच्या वेळी लक्ष्मी-नारायणाची प्रतिमा ठेवा. नारायणबरोबर देवी लक्ष्मीची पूजा केल्याने त्या अत्यंत प्रसन्न होताीत आणि घरावर त्यांची कृपा राहाते. अशा घरात धन-धान्य यांचा तुटवडा कधीही भासत नाही आणि सुख-समृध्दी इत्यादी घरात नांदते.
पितरांचा आशीर्वाद प्राप्त
हा दिवस पितरांना प्रसन्न करण्याचा दिवस आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पूर्वजांच्या नावे पिंडदान करावे. याद्वारे त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि कुटुंबाचे दु:ख दूर होते. जर तुमच्या घरात पितृदोष असेल तर पिंडदानाव्यतिरीक्त पितरांच्या मुक्तीसाठी गीतेचा सातवा अध्यायाचं पठण करा आणि पितरांना मुक्त करण्यासाठी भगवान नारायणाकडे प्रार्थना करा.
दान करा
धार्मिक मान्यतेनुसार, अक्षय्य तृतीयेच्या दिवशी केलेल्या पुण्य कर्मांचा कहीही क्षय होत नाही, तर त्यापेक्षा अनेक पटीने वाढ होते. अशा परिस्थितीत आपण गरजूंना त्यांच्या क्षमतेनुसार दान करावे. यादिवशी आपण पाण्याने भरलेला माठ, साखर, गूळ, कपडे, सरबत, तांदूळ, सोने आणि चांदी इत्यादी दान करु शकता.
शुभ काळ
अक्षय्य तृतीया : दिवस शुक्रवार 14 मे
पूजा मुहूर्त : सकाळी 5 वाजून 38 मिनिटांपासून ते 12 वाजून 18 मिनिटांपर्यंत
तृतीया तिथी संपेल : 15 मे 2021 च्या सकाळी 7 वाजून 59 मिनिटांनी
Akshaya Tritiya 2021 | कधी आहे अक्षय तृतीया, या दिवशी सोने खरेदी करणे का मानलं जातं शुभ, जाणून घ्या अक्षय तृतीयेची पौराणिक कहाणीhttps://t.co/6gXBXbaqsq#AkshayaTritiya2021
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 2, 2021
Do These Things On Akshaya Tritiya 2021 For Prosperity And Know The Shubh Muhurat
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
Vaishakh Amavasya 2021 | पितरांच्या मोक्षसाठी, कालसर्प दोष मुक्तीसाठी वैशाख अमावस्येला ‘हे’ उपाय करा
Bhaumvati Amavasya 2021 | कर्जातून मुक्तता हवी असल्यास भौमवती अमावस्येला ‘हे’ उपाय करा