Ravivaar Che Upay: रविवारचा दिवस सूर्य देवाला (Surya Dev) सर्मपित असतो. यादिवशी सूर्य देवाची विधीवत पूजा केली जाते. यादिवशी तुम्ही काही उपाय करू शकता. याने तुम्हाला सूर्य देवाचे आशीर्वाद (Blessings) लाभतील.हिंदू धर्मात (Hindu Dharma) आठवड्यातील प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित असतो.असंच रविवारचा दिवस सूर्य देवाला समर्पित असतो. यादिवशी सूर्य देवाची पूजा करणं शुभ मानलं जातं. सूर्य देवाला सफलता, आरोग्य आणि आत्मविश्वासाची देवता मानलं जातं. कुंडलीत सूर्याचे स्थान मजबूत झाल्याने जीवनात सफलता प्राप्त होते. तुमची प्रकृती चांगली राहते. सूर्य देवाच्या कृपेने घरात सुख-समृद्धी येते. बऱ्याच लोकांच्या आयुष्यात सूर्याचे स्थान कमजोर असते. अशात जीवनातील प्रगतीच्या मार्गावर बाधा येतात. सूर्याचे स्थान प्रबळ करण्यासाठी तुम्ही काही उपाय करू शकता.
ज्या लोकांच्या कुंडलीत सूर्यांचे स्थान कमजोर आहे. त्यांच्यासाठी दान करणं खूपच शुभ मानलं जातं. यादिवसी एखाद्या गरजू व्यक्तींला गुळ, लाल कापड, गहू, लाल चंदन आणि तांब्याचे भाडं दान करा. त्याने तुमची रखडलेली कामं होतात. कुंडलीत सूर्याची जागा मजबूत होते.
सूर्याला जल दान
दररोज सूर्य देवाला नियमितपणे अर्ध्य दान करा. असं केल्याने सूर्य देव प्रसन्न होतात. तांब्याच्या कलशात पाणी भरून सूर्याला जल दान करा. तांब्यात लाल फुलं, लाल चंदन आणि साखर टाका. अर्ध्य दान करताना सूर्य देवाच्या मंत्राचा जप करा. तुम्ही ओम सूर्य देवाय नमो नम: मंत्राचा जप करू शकता. असं केल्याने कुंडलीतील सूर्याचे स्थान मजबूत होते. जीवनात येणाऱ्या बाधा दूर होतात.
सूर्याला नियमीतपणे अर्ध्य दान दिलं पाहिजे. दररोज हे करणं शक्य नसेल तर रविवारच्या दिवशी सूर्यांला अर्ध्य दान नक्की द्या. सूर्यांला अर्ध्य दान देताना. काही मंत्राचे जप करणं अत्यंत शुभ मानलं जातं. तुम्ही खाली दिलेल्या या मंत्रांचा जप करू शकता.
ॐ घृणिं सूर्य्य: आदित्य:
ॐ ह्रीं ह्रीं सूर्याय सहस्रकिरणराय मनोवांछित फलम् देहि देहि स्वाहा
ॐ ह्रीं ह्रीं सूर्याय नम:
ॐ ऐहि सूर्य सहस्त्रांशों तेजो राशे जगत्पते, अनुकंपयेमां भक्त्या, गृहणार्घय दिवाकर:
ॐ ह्रीं घृणि: सूर्य आदित्य: क्लीं ॐ
रविवारच्या दिवशी पूजा-अर्चा करा. यादिवशी लाल चंदनाचा टिळा लावा. घरातील सर्व सदस्यांना लाल चंदनाचा टिळा लावा. त्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते.
रविवारच्या दिवशी मस्यांना पिठाचे गोळे खायला द्या. त्याने आर्थिक स्थितीत सुधारणा होते.
(दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे. यासंदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही.)