Vaishakh Amavasya 2021 | पितृदोषातून मुक्तता हवी असेल तर वैशाख अमावस्येला हे उपाय करा

अमावस्या तिथीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे (Vaishakh Amavasya 2021). या दिवशी स्नान, दान करणे आणि पितरांना तर्पण देणे याचं विशेष महत्त्व आहे. हिंदू कॅलेंडरनुसार 11 मे 2021 रोजी वैशाख अमावस्या आहे.

Vaishakh Amavasya 2021 | पितृदोषातून मुक्तता हवी असेल तर वैशाख अमावस्येला हे उपाय करा
amavasya pitra puja
Follow us
| Updated on: May 11, 2021 | 1:29 PM

मुंबई : अमावस्या तिथीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे (Vaishakh Amavasya 2021). या दिवशी स्नान, दान करणे आणि पितरांना तर्पण (Pitra Puja) देणे याचं विशेष महत्त्व आहे. हिंदू कॅलेंडरनुसार 11 मे 2021 रोजी वैशाख अमावस्या आहे. हा दिवस मंगळवार आहे म्हणून याला भौम अमावस्या आणि सत्वारी अमावस्या असे म्हणतात. ज्योतिष शास्त्रानुसार सूर्य आणि चंद्र एकाच राशीत किंवा एकमेकांच्या जवळपास राहतात तेव्हा त्याला भौम अमावस्या म्हणतात. या दिवशी चंद्र आणि सूर्य मेष राशीत विराजमान राहातील (Do These Upay On Vaishakh Amavasya 2021 And Know The Importance Of Pitra Puja).

पितृ पूजा करण्याचं महत्त्व काय?

आज वैशाख अमावस्या आहे. या दिवशी पितरांची पूजा करण्यास विशेष महत्त्व आहे. ज्या लोकांच्या कुंडलीत पितृ दोष आहे, त्यांनी या दिवशी पूर्वजांची उपासना केली पाहिजे. असे मानले जाते की तांदळापासून बनविलेले पिंड दान केल्याने पूर्वजांना आनंद होतो. असे केल्याने, आपल्या कुंडलीतील पितृ दोषाचा प्रभाव कमी होतो. यामुळे विवाह, नोकरी, व्यवसाय इत्यादींमध्ये कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवत नाही.

स्नान करुन दान करा

अमावस्येच्या दिवशी सकाळी पवित्र नदीत स्नान करुन गरिबांना दान केले पाहिजे. या दिवशी दान केल्याने घरात आनंद आणि समृद्धी राहते. वैशाख महिन्यातील एकादशी, पौर्णिमा आणि अमावस्येला पवित्र नदीत स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे, परंतु कोरोना विषाणूमुळे घराच राहा आणि आंघोळीच्या पाण्यात थोडं गंगाजल मिसळा आणि त्या पाण्याने स्नान करा. असे केल्याने आपल्याला पवित्र नद्यांमध्ये आंघोळ करण्यासारखे फळ मिळतील.

शुभ काळ

वैशाख अमावस्येच्या दिवशी सौभाग्य आणि शोभन योग बनत आहेत. 11 मे रोजी सौभाग्य योग रात्री 10.32 वाजेपर्यंत असेल. यानंतर शोभन योग सुरु होईल. यासह स्वाधी सिद्धी योगही बनतो आहे. 11 मे रोजी रात्री 11 वाजून 31 मिनिटांपासून दुसर्‍या दिवशी 12 मे रोजी सकाळी 5 वाजून 32 मिनिटांपर्यंत सिद्धार्थ योग असेल. हे तीन योग अतिशय शुभ आहेत. या योगामध्ये कोणतेही कार्य केल्याने यश मिळते.

Do These Upay On Vaishakh Amavasya 2021 And Know The Importance Of Pitra Puja

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Bhaumvati Amavasya 2021 | कर्जातून मुक्तता हवी असल्यास भौमवती अमावस्येला ‘हे’ उपाय करा

May Festival 2021 | ‘या’ आठवड्यात अक्षय तृतीया, ईदसह अनेक सण, जाणून घ्या कधी कुठला सण येणार…

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.