तुम्हीसुद्धा शिवलींगावर उलटे बेलपत्र वाहता का? बेलपत्र वाहण्याचे हे आहेत नियम
बेलपत्राला 3 पाने असावीत आणि ती संपूर्ण असावी, म्हणजे ती तुटलेली किंवा फाटलेली असू नये. त्यावर कोणताही डाग असता कामा नये, वा कोमेजता कामा नये. 1, 5, 11, 21 इत्यादी क्रमांकातील बेलपत्र भगवान शंकराला अर्पण केले जाते.

मुंबई : 18 जुलैपासून श्रावण महिन्याला सुरवात होणार आहे. श्रावण (Shrawan 2023) महिना असो, श्रावण सोमवार किंवा भगवान शिवाचा कोणताही आवडता दिवस असो, त्या दिवशी आपण बेलपत्र नक्कीच अर्पण करतो. बेलपत्र भगवान शिवाला खूप प्रिय आहे कारण ते त्यांना शीतलता देते. बेलपत्राशिवाय भगवान शिवाची उपासना अपूर्ण आहे. अनेक वेळा आपण सहजच भक्तीभावाने शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करतो. बेलपत्र तोडण्याचे नियम आहे आणि शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करण्याची विशेष पद्धत आहे, ज्यामध्ये मंत्रांचा उच्चार केला जातो. बेलपत्र अर्पण करण्याचे अनेक फायदे आहेत.
शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करण्याची योग्य पद्धत
जेव्हा तुम्ही भगवान शंकराची पूजा करण्यासाठी जाल तेव्हा त्याआधी बेलपत्र स्वच्छ पाण्याने धुवा. त्यानंतर बेलपत्राचा गुळगुळीत पृष्ठभाग शिवलिंगाला स्पर्श करून अर्पण करा. या दरम्यान ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा. याशिवाय बेलपत्र अर्पण करण्याचाही मंत्र आहे.
बेलपत्राला 3 पाने असावीत आणि ती संपूर्ण असावी, म्हणजे ती तुटलेली किंवा फाटलेली असू नये. त्यावर कोणताही डाग असता कामा नये, वा कोमेजता कामा नये. 1, 5, 11, 21 इत्यादी क्रमांकातील बेलपत्र भगवान शंकराला अर्पण केले जाते. जर तुमच्याकडे बेलपत्र नसेल तर तुम्ही शिवलिंगावर अर्पण केलेले बेलपत्र धुवून अर्पण करू शकता.




शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करण्याचा मंत्र
नमो बिलमिने च कवचिने च नमो वर्मीने च वरुथिने च नमः श्रुतया च श्रुतसेनाय च नमो दुंडुभ्याय च हनन्नाय च नमो घृष्णवे ॥
बेलपत्राचे महत्त्व
शिवपुराणात सांगितले आहे की, जर एखाद्या व्यक्तीने शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केले तर त्याला एक कोटी कन्यादानाचे पुण्य मिळते. सोमवारी शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केल्याने गरीबी दूर होऊन माणूस प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करतो.
या दिवसात बेल्टपत्रा तोडू नका
• चतुर्थी अष्टमी नवमी चतुर्दशी आणि अमावस्या तिथीला बेलपत्र फोडू नये. • याशिवाय तिथींच्या संक्रांतीच्या काळात आणि सोमवारीही बेलपत्र तोडू नये. • बेलपत्र तोडताना शिवाचे नामस्मरण करत राहावे. • तिची फांदी कधीही तोडू नका. पाने तोडा आणि भगवान शंकराला अर्पण करा.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)