सूर्यास्तावेळी चुकूनही करू नका अशी कामं, आरोग्यावर वाईट परिणाम आणि लक्ष्मीही रुसेल

सूर्यास्ताच्या वेळी पाच कामं तुम्हाला त्रासदायक ठरतील, असं हिंदू धर्मशास्त्रात सांगण्यात आलं आहे. त्यामुळे ही कामं प्रकर्षाने टाळावी, जेणेकरून आर्थिक अडचण किंवा आरोग्य विषयक तक्रारी उद्भवणार नाहीत.

सूर्यास्तावेळी चुकूनही करू नका अशी कामं, आरोग्यावर वाईट परिणाम आणि लक्ष्मीही रुसेल
सूर्यास्तावेळी ही कामं प्रकर्षाने टाळा, अन्यथा आरोग्य विषयक तक्रारी आणि आर्थिक चणचण भासेल
Follow us
| Updated on: Apr 19, 2023 | 5:20 PM

मुंबई : प्रत्येक जण आपल्या घरी सुख समाधान आणि समृद्धी लाभावी यासाठी प्रयत्न करत असतो. पण अनेकदा मेहनत करूनही हाती काहीच पडत नाही. कारण छोट्या चुका यासाठी कारणीभूत ठरतात. धर्मशास्त्रात याबाबत उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे सूर्यास्तावेळी काही गोष्टी प्रकर्षाने टाळणं गरजेचं आहे. कारण या चुका केल्या तर घरी दरिद्रतेचं वास होतो. त्याचबरोबर प्रत्येक कामात अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच देवी लक्ष्मीही रुसते असा उल्लेख धर्मशास्त्रात करण्यात आला आहे. चला जाणून घेऊयात धर्मशास्त्रात कोण कोणत्या गोष्टी सूर्यास्तावेळी टाळाव्या असं सांगण्यात आलं आहे.

वास्तुशास्त्रानुसार घरात सकारात्मक ऊर्जा राहावी यासाठी काही गोष्टी प्रकर्षाने करणं गरजेचं आहे. चत्वार‌खिलु कार्याणि संध्याकाले विवर्जयेत्।आहारं मैथुनं निद्रां स्वाध्यायन्च चतुर्थकम्।। या श्लोका प्रमाणे सूर्यास्तावेळी व्यक्तीने भोजन, झोपणं, प्रणय, वेदशास्त्रांचा अभ्यास आणि पैशांचा व्यवहार करणं टाळलं पाहीजे.

या गोष्टी प्रकर्षाने टाळाव्यात

  • भोजन : संध्याकाळी सूर्यास्तावेळी भोजन केल्याने नुकसान होतं. यावेळी भोजन केल्याने व्यक्तीचा पुढच्या जन्मात पशु योनीत येतो.
  • झोप : सूर्यास्तावेळी झोपणाऱ्या व्यक्तीला आरोग्यविषयक तक्रारींचा सामना करावा लागतो. त्यामुळे या वेळेत व्यक्तीने झोपू किंवा बिछान्यात लोळू नये. यामुळे देवी लक्ष्मीची अवकृपा होते आणि दरिद्रता घरी येते.
  • प्रणय : सूर्यास्तावेळी देवाची आराधना केली पाहीजे. तसेच काम भावना नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे. स्त्री आणि पुरुषाने प्रणयापासून या काळात लांब राहावं. कारण या वेळेत गर्भधारणा झाल्यास बाळाला त्रासाला सामोरं जावं लागतं.
  • वेद-शास्त्रांचा अभ्यास : श्लोकानुसार सूर्यास्तावेळी वेद आणि शास्त्रांचा अध्ययन करू नये. या वेळेस ध्यान आणि साधना करणं उत्तम राहील.
  • पैशांचा व्यवहार : संध्याकाळी पैशांचा व्यवहार करू नये. यामुळे देवी लक्ष्मी नाराज होते. त्यामुळे आर्थिक संकटाला सामोरं जावं लागतं.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.