मुंबई : प्रत्येक जण आपल्या घरी सुख समाधान आणि समृद्धी लाभावी यासाठी प्रयत्न करत असतो. पण अनेकदा मेहनत करूनही हाती काहीच पडत नाही. कारण छोट्या चुका यासाठी कारणीभूत ठरतात. धर्मशास्त्रात याबाबत उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे सूर्यास्तावेळी काही गोष्टी प्रकर्षाने टाळणं गरजेचं आहे. कारण या चुका केल्या तर घरी दरिद्रतेचं वास होतो. त्याचबरोबर प्रत्येक कामात अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच देवी लक्ष्मीही रुसते असा उल्लेख धर्मशास्त्रात करण्यात आला आहे. चला जाणून घेऊयात धर्मशास्त्रात कोण कोणत्या गोष्टी सूर्यास्तावेळी टाळाव्या असं सांगण्यात आलं आहे.
वास्तुशास्त्रानुसार घरात सकारात्मक ऊर्जा राहावी यासाठी काही गोष्टी प्रकर्षाने करणं गरजेचं आहे. चत्वारखिलु कार्याणि संध्याकाले विवर्जयेत्।आहारं मैथुनं निद्रां स्वाध्यायन्च चतुर्थकम्।। या श्लोका प्रमाणे सूर्यास्तावेळी व्यक्तीने भोजन, झोपणं, प्रणय, वेदशास्त्रांचा अभ्यास आणि पैशांचा व्यवहार करणं टाळलं पाहीजे.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)