Holashtak 2022 | 10 मार्चपासून सुरु होणाऱ्या होळाष्टकच्या दिवसात या 5 गोष्टी चुकूनही करु नका

होळी (Holi) हा सण दरवर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. होळीच्या 8 दिवस होलाष्टक (Holikasta) साजरे केली जातात.

Holashtak 2022 | 10 मार्चपासून सुरु होणाऱ्या होळाष्टकच्या दिवसात या 5 गोष्टी चुकूनही करु नका
holikasata
Follow us
| Updated on: Mar 09, 2022 | 10:02 AM

मुंबई : होळी (Holi) हा सण दरवर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. होळीच्या 8 दिवस होलाष्टक (Holikasta) साजरे केली जातात. होळाष्टकात काळात कोणतेही मांगलिक कार्य करण्यास मनाई असते.होळीच्या आधीचे हे ८ दिवस अशुभ मानले जातात. या 8 दिवसात हिरण्यकशिपूने आपला मुलगा प्रल्हादला मारण्याच्या उद्देशाने खूप अत्याचार केले होते असे मानले जाते. पण प्रल्हाद नारायणाचे नामस्मरण करत राहिला. यामुळे हिरण्यकशिपू प्रल्हादचे काहीही नुकसान करू शकला नाही. पौर्णिमेच्या (Pornima) दिवशी हिरण्यकशिपूची बहीण होलिका प्रल्हादला आपल्या मांडीत घेऊन अग्नीत बसली. होलिकाला अग्नीत न जळण्याचे वरदान होते. पण वरदानाचा गैरवापर केल्यामुळे ती स्वत: जळून राख झाली आणि प्रल्हाद सुरक्षित राहिला. अशी आख्यायीका प्रसिद्ध आहे.

होळाष्टकच्या 8 दिवसात नारायण किंवा आपल्या इष्टदेवाची पूजा करणे सर्वोत्तम मानले जाते. याकाळात जप, तपश्चर्या, स्नान आणि ध्यान हे शुभ मानले जातात. वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होलिका दहन केले जाते, त्यानंतर होळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या वर्षी होलाष्टक गुरुवार 10 मार्चपासून सुरू होत आहे. अशा परिस्थितीत होळाष्टक दरम्यान कोणत्या गोष्टी करू नयेत याबद्दल जाणून घ्या.

  1. होळाष्टक काळात हे काम करू नये मुंडन, विवाह, नामकरण , या 16 पैकी कोणतेही संस्कार या 8 दिवसांत करू नयेत. असे मानले जाते की ते शुभ फल देत नाही. कोणतेही शुभ कार्य करताना नक्की विचार करा.
  2. जर तुम्हाला नवीन वाहन घ्यायचे असेल , तर होलाष्टक लावण्यापूर्वी ते विकत घ्या, परंतु होलाष्टक दरम्यान करू नका. यानंतर होळीच्या दिवशी वाहन घरी आणावे.
  3. यादरम्यान कोणताही व्यवसाय सुरू करू नये . ज्योतिषीय कारणे पाहिल्यास, होळाष्टकच्या आठ दिवसात बहुतेक ग्रह अग्नी अवस्थेत असतात, अशा स्थितीत त्यांचे सहकार्य मिळत नाही. त्यामुळे व्यवसायात नुकसान होऊ शकते.
  4. यादरम्यान तुम्ही घर , प्लॉट इत्यादी खरेदी करण्याचा किंवा त्यांच्या रजिस्ट्रीचा विचार करत नसल्यास. होळाष्टकानंतर हे काम कोणत्याही शुभ तिथीला करावे.
  5. होळाष्टकापूर्वी घर बांधण्याचे काम करत असाल तर ते चालू द्या, पण त्याची सुरुवात होळाष्टकाने करू नये.

(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

संबंधीत बातम्या :

Chanakya Niti : ‘बचके रहना रे बाबा’ या 5 लोकांशी शत्रुत्व म्हणजे स्व:ताचे नुकसान

09 March 2022 Panchang | 09 मार्च 2022, बुधवारचे पंचांग, ​​शुभ मुहूर्त आणि राहुकाळ

Vastu tips | काय सांगताय प्रेग्नन्सी संबंधित असतात वास्तूनियम !, समजून घेऊन, योग्य ती काळजी घ्या

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.