Chanakya Niti : ‘या’ चार गोष्टी चुकूनही कोणाला सांगू नका नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान; जाणून घ्या काय सांगतात आचार्य चाणक्य
आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांचे विचार आज देखील काळाच्या कसोटीवर खरे उतरताना दिसतात. मनुष्याने आपल्या आयुष्यात कसे वागावे? मनुष्याचे आपल्या मित्रासोबत (Friend) कसे संबंध असावेत. अशा अनेक प्रश्नांची उत्तर आपल्याला चाणक्य नितीमध्ये सापडतात
Chanakya Niti : आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांचे विचार आज देखील काळाच्या कसोटीवर खरे उतरताना दिसतात. मनुष्याने आपल्या आयुष्यात कसे वागावे? मनुष्याचे आपल्या मित्रासोबत (Friend) कसे संबंध असावेत. नातेवाईकांसोबत (Relatives) कसे वागावे? कोणत्या गोष्टी आयुष्यात केल्यास तुमचे नुकसान होऊ शकते, कोणात्या गोष्टी आयुष्यात आवर्जुन कराव्यात कोणत्या गोष्टी टाळाव्यात. तुमच्या आयुष्यात अनेक संकटे येतात त्या संकटांना कसे समोर जाल अशा एकना अनेक गोष्टी आचार्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य निती या ग्रथांत लिहून ठेवल्या आहेत. आज देखील हा ग्रथ अनेकांना मार्गदर्शक ठरतो. काळाच्या ओघात यातील काही गोष्टी चुकीच्या वाटू शकतात. मात्र काही गोष्टी या आज देखील काळाच्या कसोटीवर उतरणाऱ्या आणि मनुष्याने आपले आयुष्य आदर्शपणे कसे जागावे हे सांगण्याऱ्या आहेत. आज आपण आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या अशाच काही गोष्टी पहाणार आहोत, की ज्या गोष्टी तुम्ही कोणासोबतही बोलू नका असा सल्ला आचार्य देतात.
आर्थिक नुकसान : आचार्य चाणक्य म्हणतात की, तुमचे जर आर्थिक नुकसान झाले असेल तर ते कोणालाही सांगू नका. तुम्हाला असे वाटते की, तुमचे आर्थिक नुकसान झाले आहे आणि तुम्ही तुमच्या एखाद्या मित्राला किंवा नेतेवाईकाला सांगितले तर तुम्हाला सहानभूती मिळेल, परंतु हा विचार पूर्णपणे चुकीचा आहे असे चाणक्य यांनी सांगितले आहे. तुम्हाला सहानभूती मिळण्याऐवजी लोक तुम्हाला अशा परिस्थितीमध्ये दूर ठेवणेच पसंत करतात असे आचार्य म्हणतात.
वैवाहिक भांडणे : याबाबत आचार्य चाणक्य सांगतात जर पती-पत्नीमध्ये भांडणे असतील तर ते फक्त दोघांपूरतेच मर्यादित ठेवायला हवेत, तुम्ही जर तिसऱ्या व्यक्तीसमोर तुमची समस्या सांगितली तर संबंधित व्यक्ती तुमच्यावर हसू शकते, तसेच तुमच्या नात्यामध्ये आलेल्या दुराव्याचा गौरफायदा घेऊ शकते. त्यामुळे पती-पत्नीमधील वाद दोघांमध्येच ठेवावेत
अपमानाची गोष्ट : आचार्य चाणक्य सांगतात की जर तुमचा एखाद्या व्यक्तीने अपमान केला असेल तर ही गोष्ट तुमच्या पर्यंतच मर्यादीत ठेवा, तुम्ही जर या गोष्टीची चार-चौघात चर्चा केली तर तुमचा सन्मान कमी होऊ शकतो.
तुमच्या समस्या तुमच्यापर्यंतच मर्यादीत ठेवा : याबाबत बोलताना आचार्य चाणक्य म्हणतात की, तुम्हाला जर एखादी समस्या असेल तर ती इतरांना कधीही सांगू नका, कारण असे केल्याने तुमची समस्या कमी होत नाही, मात्र तुमच्या पाठीमागे लोक तुमची मजाक उडवतात.