Dussehra 2022: मृत्यूसमयी रावणनाने लक्ष्मणाला सांगितले आयुष्याचे तीन रहस्य, तुम्हीही जाणून घ्या

रावण हा अत्यंत वाईट होता, मात्र त्यासोबतच तो एक विद्वान योद्धा देखील होता. रामाने रावणाचा वध केल्यानंतर रावणाने आयुष्याचे तीन रहस्य सांगितले.

Dussehra 2022: मृत्यूसमयी रावणनाने लक्ष्मणाला सांगितले आयुष्याचे तीन रहस्य, तुम्हीही जाणून घ्या
रावण दहन Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Oct 05, 2022 | 5:02 PM

मुंबई,  देशभरात आज दसरा (Dussehra 2022) साजरा उत्साहात होत आहे. हा दिवस वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानला जातो. असे मानले जाते की, रावण हा अत्यंत वाईट माणूस होता. कारण रावणाने माता सीतेचे अपहरण केले होते, मात्र रावण एक शक्तिशाली योद्धा असण्यासोबतच, खूप ज्ञानी आणि विद्वानही होता (Good Quality of Rawan). असे म्हणतात की मरताना रावणाने लक्ष्मणाला टीम महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या ज्यात आयुष्याचे रहस्य (Lesson From Rawan) लपलेले आहे.   रामायणातील कथेनुसार रावणाचा वध प्रभू रामाने केला होता. असे मानले जाते की, रावण हा जगातील मोठ्या विद्वानांपैकी एक होता. ती महादेवाचा खूप मोठा भक्त होता.  रावणाच्या मृत्यूच्या वेळी रामाने लक्ष्मणाला सांगितले की रावण हा नीती आणि शक्तीचा महान जाणकार आहे. अशा वेळी महान ज्ञानी रावणाकडून यशस्वी जीवनाचे ज्ञान घ्यावे.

हे ऐकून लक्ष्मण दशाननच्या पायाशी बसले. तेव्हा रावणाने लक्ष्मणाला जीवनातील तीन अमूल्य गोष्टी सांगितल्या. त्या तीन गोष्टींबद्दल जाणून घेऊया.

 पहिले रहस्य

रावणाने लक्ष्मणाला पहिली गोष्ट सांगितली की शुभ कार्य लवकरात लवकर करावे. त्यासाठी कधीही जास्त वेळ थांबू नये. कारण आयुष्य कधी संपेल हे कोणालाच माहीत नाही.

हे सुद्धा वाचा

दुसरे रहस्य

रावणाने लक्ष्मणाला दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट सांगितली की शत्रू आणि रोग कधीही लहान मानू नये. अगदी छोटासा आजारही जीवघेणा ठरू शकतो. अगदी लहान शत्रूही धोकादायक ठरू शकतो. रावणाने राम, लक्ष्मण आणि त्यांच्या वानरसेनेचा तिरस्कार केला होता आणि तेच रावणाच्या मृत्यूचे कारण बनले.

 तिसरे रहस्य

रावणाने लक्ष्मणाला तिसऱ्या रहस्याबद्दल सांगितले की, माणसाने स्वतःच्या  जीवनाशी संबंधित रहस्य शक्य तितके गुप्त ठेवले पाहिजे. त्याने कोणालाही ते सांगू नये. जरी तो तुमचा सर्वात प्रिय असला तरीही. जर ते रहस्य कोणाच्या समोर आले तर त्याचा जीवनावर वाईट परिणाम होऊ शकतो. रावणाच्या नाभीतील अमृतकुंडाचे रहस्य विभीषणाला माहीत होते आणि तेच रावणाच्या पराभवाचे कारण बनले.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?.
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?.
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'.
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.