Eco Friendly Ganesh : वाशिमच्या पाच वर्षीय स्वराने बनविली इकोफ्रेंडली गणेश मूर्ती, कागद, मैदा, फेव्हिकॉलचा केला वापर
स्वराने गणेश मूर्ती साकारण्यासाठी कागदाचे तुकडे करून मैदा, साखर आणि दूध हे साहित्य घेतले. हे सर्व साहित्य एकरूप केले. त्यानंतर विविध आकाराचे छोटे छोटे गोळे केले.
वाशिम येथील सिव्हील लाईन भागात राहणारी पाच वर्षीय चिमुकली स्वरा सुमित मिटकरी. स्वराने पर्यावरणाच्या (Environment) संरक्षणासाठी कागद, मैदा, फेव्हिकॉलपासून (Favicol) इकोफ्रेंडली गणेश मूर्ती तयार केली आहे. स्वरा सुमित मिटकरी (Swara Mitkari) ही हॅप्पी फेसेसमधील युकेजीमध्ये शिकते. या चिमुकलीने गेल्या वर्षी सुध्दा हळदीची इकोफ्रेंडली ‘गणेशमूर्ती’ बनवून समाजापुढे आदर्श निर्माण केला होता. यावर्षीसुध्दा स्वरानं वेगळ्या प्रकारे मूर्ती बनविली. यावेळी तिने कागद, मैदा, फेव्हिकॉलची इकोफ्रेंडली गणेश मूर्ती बनवली. वाशिम शहरांमध्ये कौतुकास पात्र ठरली आहे. पर्यावरण रक्षणासाठी शहाण्या माणसांनी स्वराकडून शिकण्याची गरज आहे.
अशी केली पर्यावरणपुरक मूर्ती
वाशिम येथील सिव्हिल लाइन परिसरातील सुमित सुरेश मिटकरी यांची पाच वर्षीय मुलगी स्वरा. हिला दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारे इको फ्रेंडली गणेशमूर्ती बनविण्याची आवड आहे. स्वराने गणेश मूर्ती साकारण्यासाठी कागदाचे तुकडे करून मैदा, साखर आणि दूध हे साहित्य घेतले. हे सर्व साहित्य एकरूप केले. त्यानंतर विविध आकाराचे छोटे छोटे गोळे केले. स्वराने आकर्षक इको फ्रेंडली गणेश मूर्ती साकारली आहे. हळदीची मूर्ती बनविण्यासाठी वेळ जास्त लागतो. पण ही मूर्ती पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी वरदान असल्याचा दावा स्वरा मिटकरी हिने केला आहे.
गणेश मूर्ती पाहण्यासाठी भक्तांची गर्दी
शासनाकडून महाराष्ट्रामध्ये इको फ्रेंडली पर्यावरण पूरक गणेश मूर्ती तयार करा. असे गणेशत्सोत्सवात आवाहन करण्यात येते. परंतु, शासनाच्या या आवाहनाला भक्ताकडून शंभर टक्के प्रतिसाद मिळत नाही. स्वरा मिटकरी या चिमुकलीच्या पर्यावरण पूरक इको फ्रेंडली कागद, मैदा आणि फेव्हिकॉलची गणेश मूर्ती बनविली आहे. शासनाने दखल घेऊन स्वराला सन्मानित करून पारितोषिक देण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. वाशिम शहरांमध्ये कागद, मैदा, फेव्हिकॉलची गणेश मूर्ती पाहण्यासाठी सिव्हिल लाइन परिसरामध्ये भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.