May Month Ekadashi 2021 | एकादशीला भात का खाऊ नये? जाणून घ्या धार्मिक महत्व
हिंदू धर्मात एकादशीला विशेष महत्त्व आहे. एका वर्षात एकूण 24 एकादशी येतात (Never Eat Rice On Ekadashi). एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते.
मुंबई : हिंदू धर्मात एकादशीला विशेष महत्त्व आहे. एका वर्षात एकूण 24 एकादशी येतात (Never Eat Rice On Ekadashi). एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. या दिवशी विधीवत पूजा केल्याने विष्णूजी तुमचे सर्व त्रास दूर करतील. भगवान विष्णू तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतात, अशी मान्यता आहे (Ekadashi Importance And Know Why Should Never Eat Rice On Ekadashi).
शास्त्रानुसार एकादशीचा उपवास ठेवणाऱ्यांनी काही नियम पाळले पाहिजेत. या दिवशी उपवास ठेवणाऱ्याने मांस, मासे, लसूण, कांदा आणि तांदूळ खाऊ नये. असे मानले जाते की कांदा आणि लसूण तामसिक असतात. या गोष्टी खाल्ल्याने मन अशुद्ध होते. पण तांदूळ का खाऊ नये हे आपल्याला माहिती आहे का?
जाणून घ्या यामागील धार्मिक कारण
पौराणिक कथेनुसार महर्षि मेधा यांनी देवी शक्तीच्या क्रोधापासून वाचण्यासाठी आपला देह त्याग केला. त्यांच्या शरीराचे अवयव पृथ्वीमध्ये सामावून गेले. असे म्हणतात की ज्या दिवशी महर्षी मेधा यांचे शरीर पृथ्वीमध्ये सामावले, त्या दिवशी ती एकादशी होती. त्यांनी पृथ्वीवर तांदूळ आणि जवच्या रुपात जन्म घेतला. त्यामुळे तांदळाला जीव मानलं जातं. म्हणून एकादशीला तांदूळ खाल्ले जात नाहीत. असे मानले जाते की या दिवशी भात खाणे म्हणजे महर्षी मेधा यांचे मांस आणि रक्त सेवन करण्यासारखे आहे.
वरूथिनी एकादशी 7 मे रोजी आहे
हिंदू कॅलेंडरनुसार दर महिन्याला दोनदा एकादशी येते. वैशाख महिन्यात पडणारी एकादशी वरुथिनी एकादशी (Varuthini Ekadashi) म्हणून ओळखली जाते. वैशाख महिन्यात कृष्ण पक्षात पडणारी एकादशी वरुथिनी एकादशी म्हणून ओळखली जाते. यावेळी वरुथिनी एकादशी 7 मे 2021 रोजी पडत आहे. या दिवसाला भगवान विष्णूच्या वामन अवताराची पूजा केली जाते.
वरुथिनी एकादशीचा शुभ मुहूर्त
एकादशी तिथी 06 मे 2021 रोजी दुपारी 02 वाजेपासून ते 07 मे 2021 रोजी संध्याकाळी 03 वाजून 32 मिनिटांपर्यंत असेल.
एकादशी उपवासाची वेळ – 08 मे 2021 रोजी सकाळी 05.35 ते सायंकाळी 08:16 असा असेल.
एकादशीला काय करावे
एकादशीच्या दिवशी विष्णूची पूजा करावी. या दिवशी पूजा केल्याने भगवान विष्णू तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. एकादशीला मांसाहार करु नये. या दिवशी सात्विक आहार घ्यावा.
एकादशीला भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी. या दिवशी भगवान विष्णूला सात्विक गोष्टी अर्पण करा. पूजेमध्ये तुळशीची पाने वापरा.
Varuthini Ekadashi 2021 | ज्या व्रतामुळे महावेदांना शापातून मुक्तता मिळाली ती वरुथिनी एकादशी कधी? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि महत्त्वhttps://t.co/zoCvrntVGI#Ekadashi #VaruthiniEkadashi2021
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 28, 2021
Ekadashi Importance And Know Why Should Never Eat Rice On Ekadashi
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
Kamada Ekadashi 2021 | कामदा एकादशी तिथी, वेळ, महत्त्व आणि कथा, जाणून घ्या…