Mahabharta : किता दिवस चालले होते महाभारताचे युद्ध? इतक्या लोकांचा झाला होता मृत्यू
शकुनी महाभारताच्या (Facts Of Mahabharta Yudha) प्रमुख पात्रांमधील एक आहे. शकुनी गांधार साम्राज्याचा राजा होता. हे ठिकाण वर्तमानात अफगाणिस्तानमध्ये आहे.
मुंबई : कौरव आणि पांडव यांच्यातील महाभारत युद्ध हे सर्वात विनाशकारी युद्ध मानले जाते. शकुनी महाभारताच्या (Facts Of Mahabharta Yudha) प्रमुख पात्रांमधील एक आहे. शकुनी गांधार साम्राज्याचा राजा होता. हे ठिकाण वर्तमानात अफगाणिस्तानमध्ये आहे. शकुनी गांधारीचा भाऊ होता. दुर्योधनाच्या कुटील कारस्थानामागे शकुनीची बुद्धी होती. महाभारत युद्धामागे शकुनीच कारणीभूत होता असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. शकुनीने अनेकवेळा पांडवांसोबत कपट केले आणि भाचा दुर्योधनला पांडवांविरुद्ध भडकवत राहिला. कौरव आणि पांडवांमध्ये झालेल्या द्यूतक्रीडेमध्ये शकुनीच मुख्य करविता होता. महाभारताच्या युद्धात कुरुक्षेत्राच्या मैदानात कौरवांचे अर्धमशी आणि पांडवांचे धर्माशी युद्ध झाले. हरियाणाच्या कुरुक्षेत्रात झालेल्या या महायुद्धात देश आणि जगाच्या सैन्याने भाग घेतला होता. त्याला त्या काळातील पहिले महायुद्ध असेही म्हणतात. महाभारताचे युद्ध किती दिवस चालले, त्यात किती सैनिक आणि योद्धे मारले गेले, हे तुम्हाला माहीत आहे का? चला जाणून घेऊया महाभारत युद्धाची महत्वाची आणि रंजक माहिती.
महाभारत युद्ध किती काळ चालले?
कुरुक्षेत्रापासून सुमारे 40 किमीच्या परिघात लढलेले महाभारत युद्ध 18 दिवस चालले. या युद्धात स्वतः भगवान श्रीकृष्णही सहभागी झाले होते. पण त्याने शस्त्र न घेण्याचे व्रत घेतले होते म्हणून तो अर्जुनाचा सारथी झाला. आर्यभटाच्या मते, महाभारत युद्ध 18 फेब्रुवारी 3102 ईसापूर्व झाले.
महाभारत युद्धात इतके सैनिक मारले गेले
महाभारत युद्धात असा एकही राजा शिल्लक नव्हता जो या भीषण युद्धाचा भाग झाला नाही. राण्यांनीही त्यांच्या स्तरावरून या युद्धात भाग घेतला. महाभारत युद्धात सुमारे 1.25 कोटी योद्धा-सैनिकांनी वीरगती प्राप्त केली होती. यामध्ये कौरवांच्या बाजूने सुमारे 70 लाख लोकं मारले गेले आणि पांडव सैन्याचे 44 लाख लोकं मारले गेले. महाभारत युद्धाबद्दल असे म्हटले जाते की येथे इतके रक्त सांडले गेले की आजपर्यंत तिथली माती लाल आहे.
महाभारत युद्धात इतकेच लोक वाचले
महाभारत युद्धाच्या शेवटी, पाच भावांसह 14 लोकं पांडवांच्या वतीने वाचले. दुसरीकडे, कौरवांच्या बाजूने वाचलेल्यांमध्ये अश्वथामा, द्रोणाचार्य यांचा मुलगा कृत वर्मा आणि कौरव आणि पांडवांचे शिक्षक कृपाचार्य हे होते. यासोबतच या युद्धात धृतराष्ट्राचा मुलगा आणि एक दास युयुत्सू देखील जिवंत होता, युयुत्सू हा धृतराष्ट्राचा मुलगा होता, युयुत्सू हा देखील कौरव होता, पण एक पवित्र आत्मा असल्याने त्याने पांडवांच्या वतीने युद्ध केले.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)