Falgun Amavashya 2023 : आज फाल्गुन अमावस्या, आज संध्याकाळी केलेले हे उपाय असतात अत्यंत प्रभावी
फाल्गुन अमावस्येला भगवान शिवाची पूजा करावी. अकाली मृत्यू, भय, वेदना आणि रोगांपासून संरक्षण करण्यासाठी भगवान शिवाची उपासना प्रभावी मानली जाते.
मुंबई : आज फाल्गुन अमावस्या (Falgun Amavashya) आहे. या दिवशी गंगा तसेच इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचे खूप महत्त्व आहे. या दिवशी पितरांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी पूजा करतात. अमावस्येला पितरांच्या नावाने दान केले जाते.(Amavashya Upay) फाल्गुन हा शेवटचा महिना असल्याने या महिन्यात उपासनेला विशेष महत्त्व आहे. यावर्षी फाल्गुन अमावस्या 21 फेब्रुवारी म्हणजेच आज साजरी होणार आहे. ज्यांना या दिवशी उपवास करायचा आहे ते करू शकतात. यामुळे व्यक्तीच्या सत्कर्मात वाढ होते, ज्यामुळे जीवनात शुभता वाढते. फाल्गुन अमावस्येला भगवान शिवाची पूजा करावी. अकाली मृत्यू, भय, वेदना आणि रोगांपासून संरक्षण करण्यासाठी भगवान शिवाची उपासना प्रभावी मानली जाते. जीवनातील अडचणी आणि गुंतागुंत यातून मुक्त होण्यास मदत होते. हिंदू धर्मग्रंथांमध्ये या व्रताला अश्वथ प्रदक्षिणा व्रत म्हणतात. या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी. शनिदेवाचीही पूजा करावी. जाणून घेऊया फाल्गुन अमावस्येची तिथी, योग, महत्त्व, स्नान दानासाठी शुभ मुहूर्त इत्यादी.
फाल्गुन अमावस्येचे महत्व
अमावस्या तिथीला भगवान विष्णूची उपासना करणे आणि भगवद्कथा पाठ करणे लाभदायक मानले जाते. या दिवशी केलेले दान आणि सत्कर्म कधीही न संपणारे फळ देतात.
या दिवशी उपासना करणे आणि उपवास करणे कुटुंब आणि मुलांच्या सुखासाठी फायदेशीर मानले जाते. जर कुटुंबातील कोणत्याही सदस्याला किंवा कोणत्याही व्यक्तीला पितृदोषाचा त्रास होत असेल किंवा एखाद्याच्या कुंडलीत हा दोष असण्याची शक्यता असेल तर या दिवशी विशेष पूजा आणि उपवास केल्याने या दोषापासून मुक्ती मिळते.
फाल्गुन अमावस्या पूजा विधी
- अमावस्येच्या दिवशी गंगास्नान करा, शक्य नसेल तर गंगेच्या पाण्याचे २-३ थेंब आंघोळीच्या पाण्यात मिसळू शकतात.
- स्नानानंतर सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करून सूर्यमंत्राचा जप करावा.
- यानंतर गणेशाची पूजा करून भगवान विष्णू आणि भगवान शिव यांची पूजा करावी.
- व्रत ठेवायचे असेल तर संकल्प घ्या आणि नसेल तर सामान्य पूजा करता येईल.
- भगवान विष्णूला पिवळे फुले अर्पण करा.
- देवतांना केशर, चंदन इत्यादी अर्पण करा.
- तुपाचा दिवा लावावा. अत्तर आणि तिलक लावावा.
- यानंतर धूप-दीप लावून आरती करावी.
- नैवेद्य दाखवावा.
- प्रसाद लाडू किंवा गूळ अर्पण करा.
- आपल्या पूर्वजांचे स्मरण करून त्यांच्या नावाने खाद्यपदार्थ व फळे वाटप करा.
- यानंतर ब्राह्मणांना अन्नदान करा आणि पितरांच्या नावाने दान करा.
- संध्याकाळी दिवा लावून पूजा करावी.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)