Falgun Month: फाल्गुन महिन्यात महाशिवरात्री आणि होळीसह या सणांचा असेल उत्साह

विजया एकादशीपासून होळीपर्यंतचा सण फाल्गुन महिन्यात साजरे केला जातो. जाणून घ्या फाल्गुन महिन्यात येणाऱ्या सर्व उपवास सणांची माहिती.

Falgun Month: फाल्गुन महिन्यात महाशिवरात्री आणि होळीसह या सणांचा असेल उत्साह
फाल्गुन महिनाImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Feb 01, 2023 | 6:20 PM

मुंबई, हिंदू दिनदर्शिकेनुसार वर्षातील शेवटचा महिना फाल्गुन महिना (Falgun Month 2023) असतो. म्हणूनच हिंदू धर्मात फाल्गुन महिन्याला विशेष महत्त्व आहे. हा महिना माघ महिन्याप्रमाणेच शुभ मानला जातो. म्हणूनच या महिन्यात स्नान आणि दान केल्याने शुभफल प्राप्त होते. भगवान शंकराव्यतिरिक्त फाल्गुन महिन्यात माता सीता, श्रीकृष्ण, माता लक्ष्मी आणि चंद्रदेव यांची पूजा करण्याची प्रथा आहे. पंचांगानुसार, फाल्गुन महिना 6 फेब्रुवारी 2023, सोमवारपासून सुरू होत आहे आणि 7 मार्च 2023, मंगळवार रोजी समाप्त होत आहे. महाशिवरात्री, (Mahashivratri) फुलैरा दुज, अमलकी एकादशी, विजया एकादशीपासून होळीपर्यंतचा सण फाल्गुन महिन्यात साजरे केला जातो. जाणून घ्या फाल्गुन महिन्यात येणाऱ्या सर्व उपवास सणांची माहिती.

फाल्गुन महिन्याचे 2023 चे उपवास सण

  • 6 फेब्रुवारी 2023, सोमवार – फाल्गुन महिना सुरू होत आहे
  • 9 फेब्रुवारी 2023, गुरुवार – द्विजप्रिया संकष्टी चतुर्थी
  • 12 फेब्रुवारी 2023, रविवार – यशोदा जयंती
  • 13 फेब्रुवारी 2023, सोमवार – शबरी जयंती, कालाष्टमी, कुंभ संक्रांती
  • 14 फेब्रुवारी 2023, मंगळवार – जानकी जयंती
  • 17 फेब्रुवारी 2023 शुक्रवार – विजया एकादशी
  • 18 फेब्रुवारी 2023 शनिवार – महाशिवरात्री, मासिक शिवरात्री, प्रदोष व्रत, शनि त्रयोदशी
  • 20 फेब्रुवारी 2023 सोमवार – फाल्गुन अमावस्या, सोमवती अमावस्या
  • 21 फेब्रुवारी, मंगळवार – फुलैरा दुज
  • 23 फेब्रुवारी 2023, गुरुवार – विनायक चतुर्थी
  • 25 फेब्रुवारी, शनिवार – स्कंद षष्ठी
  • 27 फेब्रुवारी 2023 सोमवार – होलाष्टक, मासिक दुर्गाष्टमी, रोहिणी व्रत
  • 3 मार्च 2023, शुक्रवार – अमलकी एकादशी, नरसिंह द्वादशी
  • 4 मार्च 2023, शनिवार – शनि त्रयोदशी, प्रदोष व्रत
  • 6 मार्च 2023, सोमवार – फाल्गुन चौमासी चौदस
  • 7 मार्च 2023, मंगळवार – होलिका दहन, छोटी होळी, वसंत पौर्णिमा, फाल्गुन पौर्णिमा, लक्ष्मी जयंती

फाल्गुन महिन्यातील प्रमुख उपवास सण

महाशिवरात्री 2023

पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री येते. धार्मिक मान्यतेनुसार माता पार्वती आणि भगवान शिव यांचा विवाह महाशिवरात्रीच्या दिवशी झाला होता. यामुळे या दिवशी भगवान शंकराचा जलाभिषेक केल्यास शुभ फल प्राप्त होते.

होळी

हिंदू दिनदर्शिकेनुसार यंदा 7 मार्चला होलिका दहन आणि 8 मार्चला होळी साजरी केली जाणार आहे. पंचांगानुसार होलिका दहनाचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 6.31 ते 8.58 पर्यंत असेल.

'मजुरी बुडवली अन् फाटक्या साड्या', लाडक्या बहिणींचा सन्मान की अपमान?
'मजुरी बुडवली अन् फाटक्या साड्या', लाडक्या बहिणींचा सन्मान की अपमान?.
चाकणकर अन् खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी
चाकणकर अन् खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी.
नितेश राणेंचं पुन्हा भडकाऊ भाषण, महायुतीत अजित पवार अन् राणे आमनेसामने
नितेश राणेंचं पुन्हा भडकाऊ भाषण, महायुतीत अजित पवार अन् राणे आमनेसामने.
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.