Feng shui tips: अविवाहित आहात?; मग बेडरूममध्ये चुकूनही ठेऊ नका ‘या’ वस्तू

प्राचीन चिनी शास्त्र फेंगशुईमध्ये (Feng shui) जीवनाच्या प्रत्येक समस्येचे निराकरण करण्यात आले आहे. ज्यामुळे आपण आयुष्याला अधिक सुखकर बनवू शकतो. लोकांना फेंगशुईशी संबंधित अनेक गोष्टी घरात ठेवायला आवडतात. फेंगशुईमध्ये लव्ह बर्ड्स, लाफिंग बुद्धा, क्रिस्टल, कासव आणि विंड चाइम यासारख्या अनेक गोष्टी अतिशय शुभ मानल्या जातात. फेंगशुईनुसार या सर्व गोष्टी घरात ठेवणे खूप शुभ मानले जाते […]

Feng shui tips: अविवाहित आहात?; मग बेडरूममध्ये चुकूनही ठेऊ नका 'या' वस्तू
Follow us
| Updated on: Jun 11, 2022 | 1:14 PM

प्राचीन चिनी शास्त्र फेंगशुईमध्ये (Feng shui) जीवनाच्या प्रत्येक समस्येचे निराकरण करण्यात आले आहे. ज्यामुळे आपण आयुष्याला अधिक सुखकर बनवू शकतो. लोकांना फेंगशुईशी संबंधित अनेक गोष्टी घरात ठेवायला आवडतात. फेंगशुईमध्ये लव्ह बर्ड्स, लाफिंग बुद्धा, क्रिस्टल, कासव आणि विंड चाइम यासारख्या अनेक गोष्टी अतिशय शुभ मानल्या जातात. फेंगशुईनुसार या सर्व गोष्टी घरात ठेवणे खूप शुभ मानले जाते आणि यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा (positive Energy) प्रवाहित राहते. फेंगशुईमध्ये असे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत ज्यामुळे तुम्हाला वैवाहिक संबंध आणि प्रेम वाढविण्यास मदत मिळते. तसेच यामध्ये अविवाहित लोकांसाठीही अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. त्यामुळे जर तुम्ही अजूनही अविवाहित असाल (Feng shui tips for unmarried) तर तुम्हाला काही गोष्टींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. चला या गोष्टींबद्दल सविस्तर जाणून घेऊया

अविवाहित लोकांनी बेडरूममध्ये ‘या’ गोष्टी ठेवू नयेत

  1. जर तुमचे लग्न झाले नसेल तर बेडरूममध्ये चुकूनही टीव्ही आणि कॉम्प्युटर ठेवू नका. कारण त्यामुळे संवादात खूप अडचणी येतात.
  2. तुमच्या बेडरूममध्ये कोणत्याही प्रकारचे विभाजन असेल, तुमच्या खोलीच्या छताच्या मध्यभागी बीम जात असेल किंवा तुमच्या पलंगावर दोन गाद्या असतील तर या सर्व गोष्टी नकारात्मक ऊर्जा वाढवतात. फेंगशुईनुसार, तुम्ही बेडवर एकच गादी ठेवावी. यामुळे नकारात्मकता दूर होईल आणि प्रेमसंबंधांमध्ये गोडवा येईल.
  3. हे सुद्धा वाचा
  4. जर तुमचे लग्न झाले नसेल तर बेडरुममध्ये नदी, तलाव, धबधबा इत्यादींची छायाचित्रे ठेवू नयेत.
  5. टॉयलेटचा दरवाजा तुमच्या पलंगाच्या अगदी समोर नसेल याची काळजी घ्या. तसे असल्यास, तो नेहमी बंद ठेवा.
  6. बेडरूममधला आरसा अशा ठिकाणी लावावा की, जिथे तुमच्या पलंगाचे परत दिसणार नाही. पण जर तुमचा आरसा बेडजवळ ठेवला असेल तर तो नेहमी झाकून ठेवावा.
  7. अविवाहितांनीही आपल्या पलंगाचा कोपरा खिडकीला किंवा भिंतीला लागून नसावा याची काळजी घ्यावी. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा वाढते.
  8. पलंगावर कपड्यांचा किंवा वस्तूंचा पसारा ठेऊ नये. याशिवाय बेडरूम नेहमी स्वछ ठेवावी.
  9. खोलीतले जाळे व धुळ वेळोवेळी साफ करावी.
  10. बेडरूममध्ये हवा खेळती राहावी तसेच भरपूर सूर्यप्रकाश यावा याची व्यवस्था करावी.
  11. पलंगावर असलेली चादर आणि उशीच्या खोळी नेहमी स्वच्छ आणि धुतलेल्या असाव्या.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.