मुंबई : भारतीय वास्तुशास्त्राप्रमाणे चिनी वास्तुशास्त्र देखील आहे ज्याला फेंगशुई (Fengshui) नावाने ओळखले जाते घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढवते. आजकाल वास्तूप्रमाणेच लोकं घरातील फेंगशुई गोष्टींवरही जास्त भर देत आहेत. असे म्हणतात की, या वस्तू घरात ठेवल्याने सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो आणि कुटूंबातील समस्या नष्ट होतात. फेंगशुई तज्ज्ञांच्या मते, जर तुमचे जीवनही अनेक समस्यांनी वेढलेले असेल तर फेंगशुईमध्ये सांगितलेले काही सोपे उपाय अवलंबून तुम्ही त्यावर मात करू शकता. या उपायांबद्दल जाणून घ्या.
फेंगशुई तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर तुम्ही आर्थिक तंगीमुळे चिंतेत असाल आणि पैशाची कमतरता तुमचा आनंद हिरावून घेत असेल, तर घरात बांबूचे रोप लावा. असे म्हटले जाते की ही वनस्पती संपत्ती आणि समृद्धी आकर्षित करते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)