FengShui/Vastu Tips for bedroom: बेडरूममधल्या ‘या’ चुका निर्माण करतात वास्तुदोष; पतिपत्नीत होतात भांडणे!
घरांमध्ये सर्व सुख-सुविधा असूनही वैवाहिक जीवन अत्यंत तणावाचे असते. लहान लहान मुद्यांवरून पती-पत्नीमध्ये भांडणे होतात. वैवाहिक जीवन सुखकर करण्यासाठी बेडरूम योग्य ठिकाणी असणे आवश्यक आहे.
अनेकांच्या घरात सध्या फेंगशुईचा (FengShui) ट्रेंड पाहायला मिळतो. लव्ह बर्ड्स, लाफिंग बुद्धा, क्रिस्टल्स, कासव, विंड चाइम (wind Chaim) इत्यादी फेंगशुई (FengShui) सकारात्मक ऊर्जा प्रवाहित करते आणि फेंगशुईनुसार, (FengShui) जर आपण काही गोष्टींची काळजी घेतली तर वास्तुदोष (Vastudosh) टाळू शकतो. बऱ्याचदा आपण पाहतो की, घरांमध्ये सर्व सुख-सुविधा असूनही वैवाहिक जीवन अत्यंत तणावाचे असते. लहान लहान मुद्यांवरून पती-पत्नीमध्ये भांडणे होतात. वैवाहिक जीवन सुखकर करण्यासाठी बेडरूम योग्य ठिकाणी असणे आवश्यक आहे. यासोबतच घराची दिशा, भिंतींचा रंग, आरसा, शौचालय, फर्निचर इत्यादी गोष्टीही योग्य ठिकाणी असणे आवश्यक असते. या सर्वांच्या असंतुलनामुळे पति-पत्नीमध्ये भांडणे, तणाव, आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. याशिवाय वास्तुशास्त्रामध्येही ((Vastushatra) सुखी वैवाहिक जीवनासाठी काही नियम सांगण्यात आले आहेत, त्यानुसार बेडरूममध्ये काही बदल केल्यास वैवाहिक जीवन (married life)अधिक सुखकर होऊ शकते.
योग्य दिशेला असावी बेडरूम-
घराच्या उत्तर किंवा उत्तर-पश्चिम दिशेला बेडरूम असावी. या दिशेला बेडरूम असल्यास पतिपत्नींचे नाते अधिक घट्ट होते. या दिशेला बेडरूम असल्यास जीवनात प्रेम टिकून राहते. नैऋत्य दिशेला बेडरूम असल्यास पती-पत्नीच्या कार्यक्षमतेत सतत वाढ होत असते.
या चुका टाळा-
- बेडरूममध्ये शक्यतो डबलबेडचा एकच पलंग असावा, पण काही कारणास्तव दोन पलंग एकत्र ठेवावे लागत असतील तर पलंगाखाली बासरी ठेवावी.
- वास्तूनुसार पलंगासमोर आरसा नसावा. असेल तर झोपताना झाकून ठेवा.
- शयनकक्षातील फर्निचर लोखंडी, कमानी, चंद्रकोर किंवा गोलाकार नसावे. आयताकृती, चौकोनी लाकडी फर्निचर वास्तूमध्ये शुभ मानले जाते.
- वास्तुदोष टाळण्यासाठी बेडरुममधला प्रकाश जास्त प्रखर नसावा. तसेच बेडवर थेट प्रकाश पडू नये. प्रकाश नेहमी मागून किंवा डावीकडून यावा अशी व्यवस्था करावी.
- वास्तूनुसार, नेहमी दक्षिण किंवा पूर्व दिशेला डोके ठेवून झोपा, जेणेकरून पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रानुसार तुम्हाला दीर्घायुष्य आणि गाढ झोप लाभेल.
- बेडरूममध्ये कधीही नद्या, धबधबे, बर्फाचे पर्वत, किंवा मासोळी यांची छायाचित्रे लावू नका. असल्यास ते लगेच काढा.
- बेडरूममध्ये विंड चाइम लावावे. ज्याच्या मधुर ध्वनीने सकारात्मक ऊर्जा प्रवाहित राहील.
- पलंगाच्या वरचा भाग म्हणजे ज्या बाजूला डोकं करतो त्याला खेटून खिडकी किंवा भिंत नसावी. यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते. तुमच्या बेडरूममध्ये लव्ह बर्ड्स ठेवू शकता.
- पती-पत्नीमध्ये भांडणे होत असतील तर बेडरूमचा दक्षिण-पश्चिम भाग शक्य तितका सजवा. भिंतींवर गुलाबी, हलका निळा रंग वापरून सकारात्मक ऊर्जा वाढवता येते.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)