रस्त्यात पैसे सापडणे शुभ की अशुभ? वास्तूशास्त्रात दिली आहे माहिती
वाटेत सापडलेले पैसे उचलायचे की नाही याबाबतही अनेकांना संभ्रम असतो, पण तुम्हाला माहित आहे का की रस्त्यावर पडलेले पैसे सापडणे अनेक संकेत देते.
मुंबई : चालता चालता अचानक वाटेत पैसे सापडणे हे आपल्या सगळ्यांसोबत कधीना कधी घडले आहे. सापडलेले पैसे अनेकजण मंदिराच्या दानपेटीत टाकतात. तर काही लोक हे पैसे गरजू व्यक्तीला दान करतात. मात्र, या पैशाचे करायचे काय, असा प्रश्नही अनेकांना पडतो. यासोबतच वाटेत सापडलेले पैसे उचलायचे की नाही याबाबतही अनेकांना संभ्रम असतो, पण तुम्हाला माहित आहे का की रस्त्यावर पडलेले पैसे सापडणे अनेक संकेत देते. रस्त्यावरून चालताना पडलेले पैसे सापडणे शुभ की अशुभ याबद्दल वास्तूशास्त्रात (Vastushastra) काय सांगीतले आहे जाणून घेऊया.
नवीन काम मिळणार
जर तुम्हाला वाटेत पैसे पडलेले दिसले तर हे सूचित करते की तुम्ही लवकरच नवीन काम मिळणार आहे, आणि या कामात प्रगतीसोबतच तुम्हाला आर्थिक लाभही होणार असल्याचे हे चिन्ह आहे.
जीवनात प्रगती होण्याचे संकेत
वाटेत कधी टाकलेले नाणे दिसले तर ते तुम्हाला जीवनात प्रगती देईल. वास्तुशास्त्रानुसार, वाटेत पडलेले नाणे तुमच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी अनेक हातातून गेलेले असते, अशा स्थितीत त्या नाण्यामध्ये अज्ञात लोकांची सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते, ज्यामुळे तुमच्या जीवनात केवळ आनंदच येतो.
वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याचे संकेत
रस्त्याने चालत असताना कधी पैशांनी भरलेली पर्स दिसली तर ते खूप शुभ चिन्ह मानले जाते. जर तुमचा वास्तुशास्त्रावर विश्वास असेल, तर पैशाने भरलेली पर्स मिळणे हे सूचित करते की तुम्हाला वडिलोपार्जित संपत्ती मिळू शकते आणि त्याचबरोबर तुम्हाला पैसाही मिळू शकतो.
देवाचा आशीर्वाद
वाटेत चालताना नाणी सापडली तर देव तुमच्या पाठीशी आहे. खरे तर नाणी ही धातूची असतात त्यामुळे पडलेल्या नाण्याला दैवी आशीर्वाद मिळतात असे मानले जाते. अशा वेळी कोणत्याही मालमत्तेत गुंतवणूक केली तर नफा होईल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)