Lunar Eclipse 2021 | वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण 26 मे रोजी, जाणून घ्या याबाबतच्या 6 महत्त्वाच्या गोष्टी

कोणतेही ग्रहण धार्मिक आणि खगोलशास्त्रीय दृष्टीकोनातून एक अतिशय महत्वाची घटना मानली जाते (First Lunar Eclipse Of 2021). वर्ष 2021 चे पहिले चंद्रग्रहण बुधवार 26 मे 2021 रोजी लागणार आहे.

Lunar Eclipse 2021 | वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण 26 मे रोजी, जाणून घ्या याबाबतच्या 6 महत्त्वाच्या गोष्टी
Lunar eclipse
Follow us
| Updated on: May 22, 2021 | 12:48 PM

मुंबई : कोणतेही ग्रहण धार्मिक आणि खगोलशास्त्रीय दृष्टीकोनातून एक अतिशय महत्वाची घटना मानली जाते (First Lunar Eclipse Of 2021). वर्ष 2021 चे पहिले चंद्रग्रहण बुधवार 26 मे 2021 रोजी लागणार आहे. हा दिवस वैशाख महिन्याच्या पौर्णिमेचा दिवस आहे. या दिवशी गौतम बौद्धांता जन्म झाला होता, अशी मान्यता आहे. त्यामुळे या दिवसाला बुद्ध पौर्णिमा देखील म्हणतात (First Lunar Eclipse Of 2021 On 26th May Know The 6 Important Things About It).

हे चंद्रग्रहण वृश्चिक राशी आणि अनुराधा नक्षत्रात लागेल. चंद्र ग्रहण दुपारी 2 वाजून 17 मिनिटांनी प्रारंभ होईल आणि संध्याकाळी 7 वाजून 19 मिनिटांना समाप्त होईल. या चंद्रग्रहणाशी संबंधित काही खास गोष्टी जाणून घेऊया –

1. हे चंद्रग्रहण भारतात कुठे दिसेल :

ग्रहणावेळी चंद्र बहुतेक भागांत पूर्व क्षितिजाच्या खाली असेल म्हणून भारतात ते दिसणार नाही. पण, हे ग्रहण काही मिनिटांसाठी बंगाल आणि पूर्व ओदिशामध्ये दिसेल, ज्यात भारताच्या पूर्व राज्यांच्या अरुणाचल प्रदेश, मिझोरम, नागालँड, मणिपूर, त्रिपुरा, आसाम आणि मेघालय यांचा समावेश असेल.

2. सूतक काळ :

भारतात हे चंद्रग्रहण उपछाया चंद्रग्रहण म्हणून पाहिले जाईल. यामुळे, चंद्रग्रहण होण्यापूर्वी 9 वाजता लागणारा सूतक काळ भारतात मान्य नसेल.

3. परदेशात कुठे दिसेल :

हे चंद्रग्रहण अमेरिका, उत्तर युरोप, पूर्व आशिया, ऑस्ट्रेलिया, प्रशांत महासागर आणि हिंद महासागराच्या काही भागात पूर्णपणे दिसून येईल. हे ग्रहण जपान, दक्षिण कोरिया, बांगलादेश, सिंगापूर, बर्मा, फिलिपिन्स आणि उत्तर आणि दक्षिण अमेरिकेत दिसून येईल.

4. छाया चंद्रग्रहण म्हणजे काय :

ग्रहण होण्यापूर्वी चंद्र पृथ्वीच्या उपछायेत प्रवेश करतो. जेव्हा पृथ्वीच्या प्रत्यक्ष सावलीत प्रवेश न करता बाहेर पडतो तेव्हा त्याला उपछाया चंद्रग्रहण म्हणतात. उपछाया चंद्रग्रहणादरम्यान चंद्र पूर्णपणे अदृष्य होत नाही, बस थोडा अस्पष्ट दिसतो. परंतु जेव्हा चंद्र पृथ्वीच्या वास्तविक सावलीत प्रवेश करतो तेव्हा तो पूर्णपणे अदृश्य होतो. तेव्हा त्याला पूर्ण चंद्रग्रहण म्हणतात.

5. वर्ष 2021 मध्ये किती ग्रहण :

या वर्षी चार ग्रहण लागणार आहेत, दोन सूर्यग्रहण आणि दोन चंद्रग्रहण असतील. वर्षाचे पहिले ग्रहण म्हणून, प्रथम चंद्रग्रहण 26 मे रोजी लागणार आहे. तर दुसरे चंद्रग्रहण 19 नोव्हेंबर रोजी लागेल. तर 10 जूनला पहिले सूर्यग्रहण आणि 4 डिसेंबर रोजी दुसरे सूर्यग्रहण लागेल.

6. ग्रहणाविषयी धार्मिक मान्यता काय :

धार्मिक मान्यतेनुसार राहू आणि केतू वेळोवेळी चंद्र आणि सूर्यावर हल्ला करतात. जेव्हा ते सूर्य आणि चंद्रावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतात त्यावेळी सूर्य आणि चंद्र कमजोर होतात आणि ग्रहण लागतं. या काळात वातावरणात नकारात्मक ऊर्जा वाढते. त्यामुळे धार्मिक ग्रंथांमध्ये ग्रहण काळात कोणतेही शुभ कार्य करण्यास मनाई आहे.

First Lunar Eclipse Of 2021 On 26th May Know The 6 Important Things About It

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Buddha Purnima 2021 | यंदाची बुद्ध पौर्णिमा आहे अत्यंत विशेष, वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण आणि दोन शुभ योगायोग

Lunar Eclipse 2021 | या महिन्याच्या अखेरीस वर्षाचं पहिलं चंद्रग्रहण, जाणून घ्या महत्त्वाची माहिती

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.