Surya Grahan 2025 date, time in India: सूर्यमालेतील ग्रहण ही खगोलीय घटना असू शकते, परंतु ज्योतिषशास्त्रानुसार त्याचा परिणाम फायदेशीर किंवा हानिकारक असू शकतो. ज्याचा प्रभाव दीर्घकाळ टिकतो. वर्षातील पहिलं सूर्यग्रहण शनिवारी म्हणजेच 29 मार्च रोजी होणार आहे, ग्रहण भारतात दिसणार नाही. याशिवाय उद्या शनि अमावस्येचाही योगायोग आहे. वर्षातील पहिले सूर्यग्रहण चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील अमावस्या तिथीला म्हणजेच 29 मार्च रोजी होईल. हे सूर्यग्रहण आंशिक असेल. हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही.
सूर्यग्रहण दक्षिण अमेरिका, आंशिक उत्तर अमेरिका, उत्तर आशिया, उत्तर-पश्चिम आफ्रिका, युरोप, उत्तर ध्रुव, आर्क्टिक महासागर आणि अटलांटिक महासागरात दिसणार आहे. भारतीय वेळेनुसार शनिवारी म्हणजेच 29 मार्च रोजी होणारे सूर्यग्रहण दुपारी 2:21 वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी 6:14 वाजता संपेल. ग्रहणाचा कालावधी 3 तास 53 मिनिटं असणार आहे.
सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे सुतक काळ भारतात प्रभावी नसेल. याचा सरळ अर्थ असा आहे की या ग्रहणाचा भारतावर किंवा जगावर कोणताही भौतिक, आध्यात्मिक, धार्मिक किंवा आध्यात्मिक परिणाम होणार नाही. या काळात भारतातील लोकांची दिनचर्या पूर्वीप्रमाणेच सामान्य राहील. धर्मग्रंथानुसार ग्रहणाचा प्रभाव फक्त त्या भागातच जाणवतो ज्या ठिकाणी तो दिसतो. हे ग्रहण भारतात दिसणार नसल्याने त्याचा भारतीयांवर कोणताही परिणाम होणार नाही.
सूर्यग्रहणानंतर गंगाजलाने स्नान करावे. संपूर्ण घर आणि देवी-देवतांची शुद्धी करा.
ग्रहण सुरु असताना थेट सूर्याकडे पाहणं टाळावं.
ग्रहण काळात गरजेनुसार घराबाहेर पडावं, शिवाय कोणतंही वाईट काम करु नये.
ग्रहण संपल्यानंतर हनुमानाची पूजा करावी.
सूर्यग्रहण काळात काहीही खाऊ नये, असे धार्मिक शास्त्रांमध्ये सांगितले आहे. पुराणात असेही सांगितले आहे की सूर्यग्रहण काळात अन्न खाल्ल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. सूर्यग्रहणाच्या वेळी अन्न खाल्ल्याने सर्व पुण्य आणि कर्मे नष्ट होतात, असेही म्हटले जाते.