देवघर बदलताना या गोष्टी अवश्य पाळा, जुने देवघर दुसऱ्यांना देणे किती योग्य
वास्तुशास्त्रातही देवघराचे विशेष महत्त्व आहे, असे म्हटले जाते की देवघर हे घरातील सर्वात सकारात्मक स्थान आहे, ज्यामुळे घरात सुख-समृद्धी राहते. बऱ्याचदा देवघर जुने झाल्यावर ते बदलण्याचा किंवा काढण्याचा विचार आपण करतो. अशा वेळेस जुन्या देवघराचे काय करावे?
मुंबई : हिंदू धर्मात पूजेला खूप महत्त्व आहे. याद्वारे आपण देवाबद्दल आदर व्यक्त करतो आणि देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त करतो. देवाची पूजा करण्यासाठी आणि त्यांची स्थापना करण्यासाठी आपण घरात देवघर ठेवतो. वास्तुशास्त्रातही देवघराचे विशेष महत्त्व आहे, असे म्हटले जाते की देवघर हे घरातील सर्वात सकारात्मक स्थान आहे, ज्यामुळे घरात सुख-समृद्धी राहते. बऱ्याचदा देवघर जुने झाल्यावर ते बदलण्याचा किंवा काढण्याचा विचार आपण करतो. पण शास्त्रात ते शुभ मानले जात नाही. होय, घरातील देवघर बदलणे किंवा काढणे शुभ मानले जात नाही. पण कधी कधी पर्याय नसतो ते बदलणे आवश्यक असते. अशा स्थितीत जुन्या देवघराचे काय करायचे? जाणून घेऊया याबद्दल वास्तूशास्त्र (Vastu Tips Marathi) काय सांगतं?
घरात ठेवलेल्या देवघराचे काय करावे?
ज्योतिषांच्या मते, घरात ठेवलेले देवघर सकारात्मक उर्जेने परिपूर्ण असते. जेव्हा तुम्ही तुमच्या घरात पूजा करता तेव्हा त्याची ऊर्जा तुमच्या घरातही राहते. दुसरीकडे, जेव्हा तुम्ही ते विकण्याचा किंवा एखाद्याला देण्याचा विचार करता तेव्हा त्याची सर्व सकारात्मक ऊर्जा त्याच्यासोबत जाते. जर तुम्ही तुमचे देवघर एखाद्याला देण्याचा किंवा विकण्याचा विचार करत असाल, तर जुन्या देवघर सर्व देवतांच्या मूर्ती किंवा फोटो घेण्यापूर्वी, मंत्रोच्चारासह नवीन देवघराची पुजा करा.
अशा प्रकारे नवीन देवघराची पूजा केल्याने देवघर ऊर्जेचा संचार होतो. दुसरीकडे, जर तुम्हाला जुन्या देवी-देवतांच्या मूर्ती किंवा फोटो काढायचे असतील तर त्या पाण्यात विसर्जीत करा. या मूर्ती आणि फोटो झाडाखाली कधीही ठेवू नयेत. वाहात्या पाण्यात ते विसर्जीत करण्याचा सल्ला शास्त्रात दिला आहे . घरामध्ये देवघर स्थापना करण्यासाठी सोमवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार हे सर्वात शुभ दिवस आहेत. मंगळवार, शनिवार आणि रविवारी घरात देवघरची स्थापना करण्यास मनाई आहे.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)