पनवेल, नवी मुंबई परिसरात गणेशमूर्तींची फ्री होम डिलिव्हरी
यंदा गणेशोत्सवामध्ये घरगुती गणरायाची प्रतिष्ठापना करणाऱ्यांना घरपोच गणेशमूर्ती देण्याचा निर्णय श्री साई मोरया कला केंद्राकडून घेण्यात आला आहे. या अनोख्या उपक्रमाचे गणेश भक्तांकडून स्वागत करण्यात आले आहे. पनवेल, नवी मुंबई परिसरातील बऱ्याच विक्रेत्यांनी आणि कला केंद्रांनी घरपोच गणपती बाप्पांची मूर्ती घरपोच देण्यात येत आहे.
नवी मुंबई : यंदा गणेशोत्सवामध्ये घरगुती गणरायाची प्रतिष्ठापना करणाऱ्यांना घरपोच गणेशमूर्ती देण्याचा निर्णय श्री साई मोरया कला केंद्राकडून घेण्यात आला आहे. या अनोख्या उपक्रमाचे गणेश भक्तांकडून स्वागत करण्यात आले आहे. पनवेल, नवी मुंबई परिसरातील बऱ्याच विक्रेत्यांनी आणि कला केंद्रांनी घरपोच गणपती बाप्पांची मूर्ती घरपोच देण्यात येत आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर कोरोनाची तिसरा लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासन सज्ज झाले आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने प्रशासनाकडून गणेशोत्सवांमध्ये गर्दी होऊ नये यासाठी आवाहन करण्यात येत आहे.
मात्र, घरगुती गणरायाची प्रतिष्ठापना करणाऱ्या गणेश भक्तांकडून गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येपासूनच गणेशमूर्ती विक्रेत्यांच्या दुकानांसमोर गर्दी होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुकानांपुढे गर्दी झाल्यास दुकानदारांवर कारवाई करणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे दुकानांसमोर होणारी गर्दी टाळण्यासाठी तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी मूर्तिकारांकडून यंदा बाप्पांची होम डिलिवरी देण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे श्री साई मोरया कला केंद्राचे मालक विशाल नलावडे, अमित सातपुते, सुहास राऊत यांनी सांगितले. पनवेल, नवी मुंबई परिसरातील बऱ्याच विक्रेत्यांनी आणि कला केंद्रांनी घरपोच गणपती बाप्पांची मूर्ती डिलिव्हरी करण्याचा निर्णय घेतला आहे.
तिसऱ्या लाटेचा विचार करता खरं तर या निर्णयाचे स्वागतच करायला हवं. आणि यामुळे गर्दी कमी होणार आहे.
गणपती आणण्यासाठी कला केंद्रावर खुप गर्दी होते. यामुळे बराच वेळ थांबावे लागते. घरपोच गणपतीची डिलिव्हरी होत असल्याने ही गर्दी टाळता येणार आहे असा उपक्रम सर्वच ठिकाणी राबवायला हवा.
Lalbaugcha Raja 2021 | लालबागचा राजा विष्णू अवतारात, शेष नागावर आरुढ लालबागच्या राजाचा फर्स्ट लूकhttps://t.co/Emg2cViEdg#LalbaugchaRaja2021 #LalbaugParel #Ganeshotsav2021
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 10, 2021
संबंधित बातम्या :
Ganesh Chaturthi 2021 | महाराष्ट्राचे आराध्य दैवत गणपती बाप्पाचं आज आगमन, भाविकांमध्ये मोठा उत्साह