Vrat-Festival of March 2022 : चैत्र पालवीत साजरे होणार सण, महाशिवरात्रीपासून होळी पर्यंत मार्च महिन्यातील व्रत आणि सणांची इत्यंभूत माहिती

इंग्रजी कॅलेंडरचा मार्च (March) हा महिना काही दिवसांवर येऊन ठेपला आहे . हा महिना उपवास आणि सणांच्या दृष्टीने खूप खास आहे.

Vrat-Festival of March 2022 : चैत्र पालवीत साजरे होणार सण, महाशिवरात्रीपासून होळी पर्यंत मार्च महिन्यातील व्रत आणि सणांची इत्यंभूत माहिती
Vrat-Festival-of-March-2022
Follow us
| Updated on: Feb 24, 2022 | 12:49 PM

मुंबई : इंग्रजी कॅलेंडरचा मार्च (March) हा महिना काही दिवसांवर येऊन ठेपला आहे . हा महिना उपवास आणि सणांच्या दृष्टीने खूप खास आहे . या महिन्यात दर महिन्याला येणारी चतुर्थी, एकादशी, प्रदोष या व्रतांसोबतच महाशिवरात्री (Mahashivratri) , गणगौर व्रत देखील पाळले जाणार आहे. यासोबतच फुलेरा दूज, होळी सारखे मोठे सणही असतील. मार्च महिन्यात फाल्गुन महिना संपतो आणि चैत्र महिना सुरू होतो. दरवर्षी हिंदू (Hindu) नववर्ष चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून सुरू होते. या महिन्यात कोणते सण येणार आहेत आणि ते कसे साजरे करणार याबद्दल जाणून घेऊयात. मार्च महिन्यात येणाऱ्या प्रमुख उपवास आणि सणांची इत्यंभूत माहिती घेऊया.

मार्च 2022 उपवास आणि सण

  1. 01 मार्च, मंगळवार: महाशिवरात्री
  2. 02 मार्च, बुधवार: फाल्गुन अमावस्या
  3. 04 मार्च, शुक्रवार: फुलैरा दूज,
  4. 06 मार्च, रविवार: रामकृष्ण जयंती, विनायक चतुर्थी
  5. 08 मार्च, मंगळवार: विनायक चतुर्थी
  6. 10 मार्च, गुरुवार: दुर्गा अष्टमी व्रत, होलाष्टक
  7. 14 मार्च सोमवार: अमलकी एकादशी
  8. 15 मार्च, मंगळवार: मीन संक्रांती
  9. 17 मार्च, गुरुवार: फाल्गुन पौर्णिमा, होलिका दहन, छोटी होळी
  10. 18 मार्च, शुक्रवार: होळी, फाल्गुन पौर्णिमा व्रत, गणगौर उपवास
  11. 21 मार्च, सोमवार: भालचंद्र संकष्टी चतुर्थी
  12. 22 मार्च, मंगळवार: रंगपंचमी, चैत्र महिना
  13. 25 मार्च, शुक्रवार: शीतला अष्टमी, कालाष्टमी,चैत्र कृष्ण प्रतिपदा तिथी
  14. 28 मार्च, सोमवार: पापमोचिनी एकादशी
  15. 29 मार्च, मंगळवार: प्रदोष व्रत
  16. 30 मार्च, बुधवार: मासिक शिवरात्री, रंग तेरस, मधु कृष्ण त्रयोदशी

हे विशेष सण आहेत

महाशिवरात्री : या दिवशी महादेव आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता.

फाल्गुन अमावस्या: फाल्गुन महिना हा हिंदू कॅलेंडरचा शेवटचा महिना आहे. या महिन्यातील अमावस्या तिथीलाही विशेष महत्त्व देण्यात आले आहे. पितरांसाठी केलेल्या कोणत्याही कार्यासाठी हा दिवस उत्तम आहे.

फुलेरा दूज : हा दिवस ब्रजमधील होळीच्या प्रारंभाचा दिवस मानला जातो. या दिवशी राधारानी आणि तिचे भक्त फुलांनी होळी खेळतात. यानंतर दररोज वेगवेगळी होळी खेळली जाते.

होळाष्टक : 10 मार्चपासून आठ दिवस होळाष्टक होणार आहे. या काळात कोणतेही शुभ कार्य करण्यास मनाई आहे.

होळी : होळी हा हिंदूंच्या प्रमुख सणांपैकी एक आहे. होळीचा सणही दरवर्षी मार्च महिन्यात येतो.

संबंधीत बातम्या :

Chanakya Niti | भविष्याचा तुमचा आधार भक्कम करा, तुमच्या पाल्यांना योग्य संस्कार द्या

24 February 2022 Panchang | 24 फेब्रुवारी 2022, गुरुवारचे पंचांग, ​​शुभ मुहूर्त आणि राहुकाळ

Tirumala Tirupati | निसर्गाच्या सौंदर्यात विराजमान झालेल्या श्रीमंत तिरुपतीच्या भेटीला आज 20 हजार भाविकांची मंदियाळी

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.