Full Moon | गली में आज चांद निकला, ‘फुल मून’ दर्शन, आज दिसणार चंद्राचे सर्वात तेजस्वी रूप
मंगळवारी रात्री 10 वाजल्यापासून पौर्णिमा (Paurnima) सुरू झाली आहे. आज बुधवारी तुम्ही आकाशात चंद्राचे सर्वात तेजस्वी रूप पाहू शकाल .
मुंबई : मंगळवारी रात्री 10 वाजल्यापासून पौर्णिमा (Paurnima) सुरू झाली आहे. आज बुधवारी तुम्ही आकाशात चंद्राचे सर्वात तेजस्वी रूप पाहू शकाल . या रात्री 100% चंद्र प्रकाशमय असेल आणि असे दृश्य पाहणे ही प्रत्येकासाठी अद्भूत घटना असेल. जगभरातील खगोलशास्त्रज्ञही या खगोलीय घटनेबद्दल खूप उत्सुक आहेत. प्राचीन काळी लोक निसर्गाच्या ऋतुंमध्ये होणाऱ्या बदलांविषयी माहिती मिळवण्यासाठी पौर्णिमा म्हणजेच पूर्ण चंद्राचा (Moon) उपयोग करत असत. त्यामुळे त्यांनी प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेच्या चंद्राला एक वेगळे नाव दिले होते. या नावांनुसार डिसेंबरमध्ये येणाऱ्या पौर्णिमेच्या चंद्राला ‘कोल्ड मून’ (Cold Moon) असे म्हणतात. उत्तर अमेरिकेत याला ‘लाँग नाईट्स मून’ देखील म्हटले जाते. तर, ख्रिसमसच्या दिवसानंतर दिसणाऱ्या या चंद्राला युरोपमध्ये ‘मून आफ्टर युल’ असे म्हणतात. कोल्ड मूनचे दुसरे नाव ‘वुल्फ मून’ असेही आहे.
‘फुल मून’ कधी दिसतो या वर्षाच्या दुसऱ्या पौर्णिमेला ‘फुल मून’चे दर्शन होणार आहे, त्यामुळे बुधवारी संध्याकाळपासून संपूर्ण जगाचे आकाशाकडे असेल. ज्यावेळेस चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ येतो तेव्हा ‘फुल मून’ दिसतो.
चंद्रदर्शनाचे महत्त्व हिंदू धर्मानुसार चंद्राला देवता मानले जाते. इतकेच नाही तर सर्व नऊ ग्रहांमध्ये चंद्राला विशेष स्थान देण्यात आले आहे. चंद्राचा आपल्या जीवनावर मोठा प्रभाव आहे. अशा स्थितीत अनेक लोकांमध्ये चंद्राची पूजा करण्याचा विधीही केला जातो. असे मानले जाते की चंद्राची पूजा आणि व्रत पाळल्याने जीवनातील सर्व नकारात्मक विचार दूर होतात होतात.
पितरांचाही आशीर्वाद मिळतो या दिवशी उपवास करताना चंद्राच्या शक्तिशाली मंत्रांचा जप केला जातो, ज्यामुळे चांगले परिणाम मिळण्यास मदत होते. चंद्र हा मानवी मनाचा मानक मानला जातो.चंद्रदर्शनाच्या दिवशी भक्त त्यांची पूजा करून कृतज्ञता व्यक्त करतात. चंद्रदर्शनाच्या दिवशी लोक आपल्या पूर्वजांची पूजा करतात आणि त्यांचे आशीर्वाद घेतात.
(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)
संबंधीत बातम्या :
Chanakya Niti : व्यर्थ खर्च करताय ? वेळीच सावध व्हा, नाहीतर भविष्य अंधारात गेलेच म्हणून समजा