मुंबई : श्रावण महिना लागल्यानंतर लहान मोठ्यांसह सगळेच बाप्पाच्या आगमनासाठी आतुर झालेले असतात. दरवर्षी गणेशोत्सव देशात मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा केला जातो. याला गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi 2023) किंवा विनायक चतुर्थी असेही म्हणतात. हा सण भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणपतीचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. 10 दिवस चालणाऱ्या या महोत्सवाची ख्याती संपूर्ण भारतभर पाहायला मिळते. यादरम्यान भाविक सलग 10 दिवस संपूर्ण विधीपूर्वक गणपतीची पूजा करतील. गणेश चतुर्थीला गणपती बाप्पाची पूजा केल्याने सर्व अडथळे दूर होतात असे म्हणतात. जिथे बाप्पाचा वास असतो तिथे प्रत्येक क्षणी सुख-समृद्धी असते, असेही म्हणतात. मात्र, यावेळी गणेश चतुर्थीच्या नेमक्या तारखेबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे. अशा परिस्थितीत या वर्षी गणेश चतुर्थी कधी आहे हे जाणून घेऊया, तसेच शुभ मुहूर्त आणि स्थापना पद्धत जाणून घेऊया.
पंचांगानुसार या वर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी 2 दिवस राहिली असली तरी तिची उदय 19 सप्टेंबर रोजी होईल. त्यामुळे 2023 मध्ये गणेशोत्सव 19 सप्टेंबरपासून सुरू होऊन 28 सप्टेंबर 2023 रोजी संपेल. अशा परिस्थितीत 28 सप्टेंबर 2023 रोजी गणेश विसर्जन होणार आहे.
पंचांगानुसार 19 सप्टेंबर रोजी स्वाती नक्षत्र दुपारी 01.48 पर्यंत राहील. त्यानंतर विशाखा नक्षत्र रात्रीपर्यंत राहील. अशा स्थितीत गणेश चतुर्थीच्या दिवशी 2 शुभ योग तयार होतील. याशिवाय या दिवशी वैधृती योगही असेल, जो अत्यंत शुभ मानला जातो.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)