Ganesh Chaturthi 2024 : बाप्पाला दूर्वा का वाहिल्या जातात? हे माहीत असायलाच हवं… रोचक कथा काय?

श्रीगणेशाचा उत्सव हा भक्तीचा उत्सव असतो. या उत्सवात सर्वजण देहभान विसरून जातात. दहा दिवस आपल्या लाडक्या बाप्पाची मनोभावे पूजा करतात. त्याला मोदक दाखवतात. दूर्वा चढवतात. आरती घेतात आणि भक्तीत तल्लीन होतात. पण बाप्पाला दूर्वाच का चढवली जाते हे माहीत आहे काय?

Ganesh Chaturthi 2024 : बाप्पाला दूर्वा का वाहिल्या जातात? हे माहीत असायलाच हवं... रोचक कथा काय?
Follow us
| Updated on: Sep 04, 2024 | 11:29 AM

Ganesh Chaturthi 2024 : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. त्यामुळे उत्सवाची लगबग सुरू झाली आहे. यंदा गणेशोत्सव 7 सप्टेंबर रोजी आहे. त्यामुळे सर्वचजण गणेशाची आतुरतेने वाट पाहत आहेत. गणेश चतुर्थीला म्हणजे दहाव्या दिवशी बाप्पाचं विसर्जन केलं जातं. या दिवशी बाप्पाला भक्तांकडून निरोप दिला जातो. त्यावेळी बाप्पाची पूजाही केली जाते. तब्बल दहा दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात संपूर्ण देश भक्तीरसात डुबलेला असतो. गणेशाला मोदक देण्यापासून ते दूर्वा वाहण्यापर्यंतचं काम प्रत्येकजण भक्तीभावाने करत असतो.

पण बाप्पा दुर्वाच का वाहतात माहीत आहे का? धार्मिक मान्यतेनुसार, दूर्वा पूजेत अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. दूर्वांशिवाय गणेशाची पूजा अर्धवट मानली जाते. दूर्वा चढवल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. त्यामुळेच गणेशोत्सवात बाप्पाला दूर्वा का चढवल्या जातात याची माहिती जाणून घेऊया…

गणेश चतुर्थी कधी आहे?

वैदिक पंचागानुसार, यावर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीच्या तिथीची सुरुवात 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजून एक मिनिटाने सुरू होते. या तिथीचा समारोप 7 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजून 37 मिनिटांनी होईल. उदया तिथीच्या अनुसार, गणेश चतुर्थीचा शुभारंभ 7 सप्टेंबर म्हणजे शनिवारपासून होईल. याच दिवशी गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते आणि व्रत ठेवलं जातं.

धार्मिक महत्त्व

बाप्पाला विघ्नहर्ताही म्हटलं जातं. बाप्पाला दूर्वा चढवल्याने सर्व प्रकारची विघ्नं दूर जातात असं सांगितलं जातं. तसेच प्रत्येक कार्यसिद्धीला जातं असंही सांगितलं जातं. दूर्वाला पवित्र आणि शुद्ध मानलं जातं. पूजेचं कार्य पवित्रतेने केले जाते म्हणूनच बाप्पाला दूर्वा वाहिल्या जातात असं सांगितलं जातं. बाप्पाला दूर्वा चढवल्याने घरात सुख-समृद्धी येते. भगवान गणेशाला खूश करण्यासाठी आणि त्याची कृपा मिळवण्यासाठी दूर्वा वाहिल्या जातात. दूर्वा या गणेशाच्या सन्मानाचं प्रतिक मानलं जातं. तसेच त्याच्या प्रतीची श्रद्धा आणि भक्तीही दर्शविते. त्यामुळे गणपती पूजेत गणेशाला दूर्वा अर्पण केल्या जातात.

पूजेत दुर्वांचा उपयोग

मान्यतेनुसार, गणेशाला दूर्वा चढवल्याने संकट दूर होतं. सर्व कार्य सिद्धीला जातात. तसेच कोणत्याही शुभ कार्यापूर्वी दूर्वा घराच्या मुख्य प्रवेशद्वारात लावल्यास सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. घरातील चारही दिशेला दूर्वा फिरवल्यास घरातील नकारात्मकता दूर जाते, असंही सांगितलं जातं.

कथा काय सांगते?

याची एक पौराणिक कथाही आहे. या कथेनुसार, प्राचीन काळात अनलासूर नावाचा एक दैत्य होता. त्याच्या दहशतीने आणि अत्याचाराने ऋषी मूनी, देवतांसह मनुष्यप्राणीही वैतागले होते. हा दैत्य सर्वांना जिवंत गिळायचा. त्यामुळे सर्वच हादरून गेले होते. हाहा:कार उडाला होता. तेव्हा सर्व देव एकत्र आले. ते भगवान शंकराला भेटले. त्यांनी या दैत्याच्या अत्याचाराचा पाढाच भोळ्या शंकरापुढे मांडला. आणि या दैत्याचा खात्मा करण्याची विनंती केली. त्यानंतर अनलासुराचा नाश केवळ गणेशच करेल असं शंकराने सांगितलं.

त्यानंतर सर्व देवांनी मिळून गणेशाची प्रार्थना केली. तेव्हा विघ्नहर्ता गणेश अनलासुराकडे गेले आणि त्यांनी या दैत्याला गिळून टाकलं. श्रीगणेशाने राक्षसाला गिळलं. पण त्याला गिळल्यानंतर त्यांच्या पोटात दाह निर्माण झाला. तेव्हा कश्यप ऋषींनी त्यांना 21 दूर्वा खायला दिल्या. त्यामुळे पोटातील दाह शांत झाला. तेव्हापासून गणेशाला दूर्वा वाहण्याची परंपरा सुरू झाली. या दूर्वामुळे भगवान प्रसन्न होतात असं मानलं जाऊ लागलं.

दुर्वांचं महत्व काय ?

दुर्वांचा उपयोग शरीराचा दाह, उष्णता कमी होण्यासाठी होतो, असं आपण ऐकलं आहे. पण दुर्वांचा फक्त तेवढाच उपयोग नाही. दुर्वा आरोग्यासाठी अतिशय गुणकारी असून त्वचाविकारांपासून ते पचन संस्थेतील दोष कमी करण्यापर्यंत अनेक आजारांसाठी दुर्वांचा रस घेण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. ज्या व्यक्तींना सतत उष्णतेचा त्रास होतो, अशा व्यक्तींसाठी दुर्वा वरदान ठरतात. दुर्वा या शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. अनेकवेळा अन्न खाण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे शरीरामध्ये विषारी पदार्थ तसेच राहतात. शरीरातून विषारी पदार्थ काढण्याठी डिटॉक्स वॉटर अथवा अन्य गोष्टींचा उपयोग केला जातो. यासाठी तुम्ही दुर्वांचाही उपयोग करू शकता.शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढण्यासाठी दुर्वांच्या रसाचा वापर करता येतो.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.