Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ganesh Chaturthi 2024 : गणरायाचे वाजत गाजत आगमन.. बाप्पाला मोदकांचाच नैवेद्य का दाखवतात ? जाणून घ्या काय आहे मान्यता !

हिंदू पंचांगानुसार दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला गणेशोत्सव सुरू होतो. यावेळी भक्तगण गणपती बाप्पा मोरया च्या गजरात बाप्पाचे स्वागत करतात, त्याची स्थाआपना करून, पूजा करून बाप्पाला मोदकांचा नैवेद्य दाखवतात. पण बाप्पाला मोदकच का दाखवतात, त्यामागे काय मान्यता आहे हे तुम्हाला माहीत आहे का ?

Ganesh Chaturthi 2024 : गणरायाचे वाजत गाजत आगमन.. बाप्पाला मोदकांचाच नैवेद्य का दाखवतात ? जाणून घ्या काय आहे मान्यता !
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Sep 07, 2024 | 9:29 AM

भाद्रपद महीना सुरू होताच सर्वांना वेध लागतात ते गणेश चतुर्थीचे… सर्वांच्या लाडक्या गणरायाचे या दिवशी वाजत गाजत स्वागत केले जाते. गणपती बाप्पा मोरया च्या गजरात गणराय घरी येतात, त्यांची प्राणप्रतिष्ठा , पूजा, आरती केली जाते. सर्वत्र उत्साहाचे, मंगलमय वातावरण असते. हा उत्सव भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीपासून सुरू होतो आणि अनंत चतुर्दशीपर्यंत चालू राहतो. गणरायाच्या चरणी विविध मिठाई, प्रसाद म्हणून ठेवल्या जातात. पण सर्वात थास असतात ते मोदक. गणरायाला 21 मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो. मात्र बाप्पाला मोदकच का दाखवतात, त्यामागे काय मान्यता आहे हे तुम्हाला माहीत आहे का ? पुराणात यासंदर्भात एक खास, रोचक कथा आहे.

काय आहे कथा ?

गणेशाला मोदक प्रिय का, त्याबद्दल अनेक गोष्टी प्रचलित आहेत. पहिल्या कथेनुसार, एकदा भगवान शिव झोपले होते आणि गणपती हे दरवाजावर पहारा देत होते. तेव्हा परशुराम तेथे पोहोचले, तेव्हा गणेशाने त्यांना तेथेच रोखले. ते पाहून परशुराम चिडले आणि त्यांनी गणपतीसोबत लढाई सुरू केली. जेव्हा परशुराम पराभूत होऊ लागले, तेव्हा त्यांनी शिवजींनी दिलेल्या परशुने गणपतीवर हल्ला केला. त्यामुळे गणेशाचा एक दात तुटला

तुटलेल्या दातामुळे गणरायाला खूप वेदना जाणवू लागल्या आणि खाण्यापिण्यात त्रास होऊ लागला. त्यांची ही स्थिती पाहून पार्वती मातेने त्यांच्यासाठी मोदक तयार केले. ते खूप मऊ असतात आणि फार चावावे लागत नाहीत. मऊ मोदक खाता आल्याने गणरायेच पोट भरले आणि तो खूप आनंदी झाला. तेव्हापासून गणेशाला मोदक अतिप्रिय झाले.

21 मोदकांचा नैवेद्य का ?

आणखी एका पौराणिक कथेनुसार, एकदा भगवान शिव, देवी पार्वती आणि भगवान गणेश जंगलात अत्री ऋषींची पत्नी देवी अनुसूया यांच्या घरी गेले. तेथे पोहोचताच भगवान शिव आणि गणेश यांना भूक लागली, त्यानंतर सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली. जेवल्यानंतर देवी पार्वती आणि भगवान शिव यांची भूक भागली, पण गणपती बाप्पाचे पोट काही भरले नाही. बाप्पाची भूक भागवण्यासाठी अनुसया यांनी गणरायाला सर्व प्रकारचे पदार्थ खाऊ घातले, पण त्यांची भूक भागली नाही.

गणरायाचे पोट भरलेच नाही हे लक्षात आल्यावर अनुसूया यांनी विचार केला की काहीतरी गोड खाल्ल्याने त्याची भूक शमू शकते. अशा परिस्थितीत अनुसूया या गणपतीसाठी मिठाईचा तुकडा घेऊन आल्या. तो खाल्ल्याबरोबरच गणेशजींचे पोट भरले, त्यांनी मोठी ढेकर दिली आणि त्यांची भूक भागली. गणरायाची भूक भागताच भगवान शिव यांनी 21 वेळा ढेकर दिल्याने त्यांची भूक भागली. त्यानंतर, माता पार्वतीने त्या गोड पदार्थाचे नाव विचारले असता देवी अनुसूया यांनी सांगितलतले की त्या पदार्थाला मोदक म्हणतात. तेव्हापासून मोदक हा गणपतीचा आवडता पदार्थ मानला जातो आणि गणपतीला मोदक अर्पण करण्याची परंपरा सुरू झाली. असे मानले जाते की जर गणपतीला 21 मोदक अर्पण केले गेले तर सर्व देवतांचे पोट भरते. यासह, गणपती आणि इतर सर्व देवतांचे आशीर्वाद मिळतात.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही.)

केस गळतीनंतर आता नख गळती; बुलढण्यात चाललंय काय?
केस गळतीनंतर आता नख गळती; बुलढण्यात चाललंय काय?.
ठाकरेंची सेना सिल्व्हर ओकच्या कचराकुंडीत..., शिवसेनेच्या नेत्याची टीका
ठाकरेंची सेना सिल्व्हर ओकच्या कचराकुंडीत..., शिवसेनेच्या नेत्याची टीका.
जागरण गोंधळातील जेवणातून 79 जणांना विषबाधा
जागरण गोंधळातील जेवणातून 79 जणांना विषबाधा.
‘तुम मराठी लोग गंदा...’, मुंबईत पुन्हा मराठी माणसाचा अपमान, घडलं काय?
‘तुम मराठी लोग गंदा...’, मुंबईत पुन्हा मराठी माणसाचा अपमान, घडलं काय?.
धनंजय मुंडेंचा शिरूर कासारचा दौरा रद्द, ट्विट करून दिली माहिती
धनंजय मुंडेंचा शिरूर कासारचा दौरा रद्द, ट्विट करून दिली माहिती.
'शिंदेंना त्या विमानातून उतरवलंय, आता ते ट्रेनचे....', राऊतांनी डिवचलं
'शिंदेंना त्या विमानातून उतरवलंय, आता ते ट्रेनचे....', राऊतांनी डिवचलं.
'जो बिरोबाचा नाही झाला..', संभाजी ब्रिगेडकडून पडळकरांवर पलटवार
'जो बिरोबाचा नाही झाला..', संभाजी ब्रिगेडकडून पडळकरांवर पलटवार.
पहिल्यांदाच धस-मुंडे एकत्र, नामदेव शास्त्री एकाच वाक्यात म्हणाले...
पहिल्यांदाच धस-मुंडे एकत्र, नामदेव शास्त्री एकाच वाक्यात म्हणाले....
बेडकासारख्या उड्या मारत आलेले आम्हाला शिकवणार का?
बेडकासारख्या उड्या मारत आलेले आम्हाला शिकवणार का?.
बारमध्ये डान्स अन् हातात रायफल... PSI रणजीत कासलेंचा व्हिडीओ व्हायरल
बारमध्ये डान्स अन् हातात रायफल... PSI रणजीत कासलेंचा व्हिडीओ व्हायरल.