Ganesh Chaturthi 2023 | वंदेभारत एक्सप्रेसमध्ये झाले बाप्पा विराजमान, आर्कीटेक्टने साकारला अनोखा देखावा

मुंबईत गणपती बाप्पासाठी वंदेभारत एक्सप्रेसचे अनोखे डेकोरेशन साकारण्यात आले आहे. वंदेभारत एक्सप्रेसमध्ये चक्क बाप्पा विराजमान झाले आहेत.

Ganesh Chaturthi 2023 | वंदेभारत एक्सप्रेसमध्ये झाले बाप्पा विराजमान, आर्कीटेक्टने साकारला अनोखा देखावा
vandebharat ganeshImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Sep 22, 2023 | 6:16 PM

नवी दिल्ली | 22 सप्टेंबर 2023 : देशातील विविध राज्यात गणपतीच्या आगमनाने वातावरण मंगलमय झाले आहे. गणेशोत्सवात पारंपारिकता आणि आधुनिकतेचा संगम झालेला दिसत आहे. गणपतीसाठीची सजावट आणि देखाव्यावर देखील आधुनिकतेचा प्रभाव जाणवत आहे. मुंबईतील एका देखाव्यावर चक्क भारतीय रेल्वेच्या वंदेभारत एक्सप्रेसचा प्रभाव दिसून आला आहे. या गणेशाची सजावट त्यामुळे चर्चेचा विषय झाली असून त्यास पहायला येणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे.

गणेशोत्सवाची धामधूम सध्या सुरु आहे. या महोत्सवात सारे जण गणपती बाप्पाच्या सेवेत रुजू झाले आहेत. मुंबईत ‘मेक इन इंडीया’ अंतर्गत भारतीय रेल्वेने तयार केलेली पहिली सेमी हायस्पीड वंदेभारत एक्सप्रेस गणेशोत्सवाच्या डेकोरेशनमध्ये समाविष्ट झाली आहे. देशात सध्या विविध राज्यात 75 वंदेभारत एक्सप्रेस सुरु आहेत. या वंदेभारतने प्रवाशांचा वेळ वाचत असल्याने तिला चांगली प्रवासी संख्या लाभली आहे.

मुंबईतील सांताक्रुझ येथील एका गणेशभक्ताने भगव्या रंगातील नव्या वंदेभारतची प्रतिकृती तयार केली आहे. आणि तिच्या आत गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. या गणेश मंडळाचे आयोजक दीपक मकवाना दरवर्षी ‘मेक इन इंडीया’ मोहिमेतील विषय गणपतीच्या सजावटीसाठी निवडत असतात. येथील सजावट अशी तयार केली आहे की आपल्याला आपण एखाद्या रेल्वे प्लॅटफॉर्मवर आलो आहोत.

येथे पाहा वंदेभारत थीमचा बाप्पा –

मेक इन इंडीयाला चालना

यापूर्वी त्यांनी राम मंदिर, चंद्रयान-2, कोविड-19 व्हॅक्सीन, चिनाब नदीवरील जगातील सर्वात मोठा पुल अशा विषयावर गणपती डेकोरेशन तयार केले होते. वंदेभारतचा देखावा तयार करण्यासाठी त्यांना दोन महिने लागले. इंटेरियर डीझाईनर असलेल्या मकवाना यांना या कलेत खूपच गती मिळाली आहे. आमचा गणपती पर्यावरण अनुकूल आहे. यावर्षी चंद्रयान-3 च्या यशावर आधारित डेकोरेशनची संख्या सर्वाधिक आहे.

मकवाना यांचे निवेदन येथे पाहा –

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.