ganeshotsav 2022: गणपतीला का म्हणतात एकदंत? काय आहे यामागची कथा
ganeshotsav 2022 Why Ganesha is called Ekdanta The story behind what is
सध्या देशभरात दहा दिवसांचा गणेशोत्सव (Ganeshotsav 2022) साजरा केला जातो. घरोघरी, गल्लीबोळात गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. गणपतीच्या विविध रूपांची भाविक मनोभावे पूजा करीत आहेत. गणपतीचे तब्बल 108 नाव आहे. त्यापैकी एक नाव एकदंत (Ekadanta) आहे. म्हणजे एक दात असलेला. गणपतीचा एक दात कसा तुटला याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? त्याला एकदंत कसे का म्हणतात? गणपती एकदंत असल्याच्या अनेक आख्यायिका (story) आहेत.
परशुराम ऋषींसोबत झालेल्या युद्धात तुटला दात
गणेश पुराणानुसार, एकदा ऋषी परशुराम भगवान भोलेनाथांना भेटण्यासाठी कैलास पर्वतावर पोहोचले. त्यावेळी महादेव तपश्चर्येत लीन झाले असता, भगवान गणेशाने परशुरामांना शिवाला भेटण्यासाठी थांबण्यास सांगितले. यामुळे परशुराम संतप्त झाले. यानंतर गणपती आणि परशुराम यांच्यात युद्ध झाले. या दरम्यान परशुरामाच्या प्रहारामुळे गणपतीचा एक दात तुटला.गणपती वेदनेने विव्हळू लागले. गणपतीचे दुःख पाहून माता पार्वती परशुरामावर कोपली. नंतर ऋषी परशुरामाने देवी पार्वतीची क्षमा मागितली आणि बाप्पाला त्यांची शक्ती, सामर्थ्य आणि ज्ञान दिले.
तुटलेला दात गणपती ठेवतात हातात
गणपतीच्या तुटलेल्या दाताबद्दल आणखी एक आख्यायिका प्रचलित आहे. एकदा कार्तिकेय आपल्या कामात मग्न होता. गणपती त्यांच्या कामात वारंवार अडथळे निर्माण करत होते. त्यामुळे संतप्त झालेल्या कार्तिकेयाने गणपतीचा एक दात तोडला. महादेवाच्या सांगण्यावरून कार्तिकेयाने गणपतीला तो दात परत केला, पण त्याचवेळी गणेशजींना हा तुटलेला दात नेहमी हातात ठेवावा लागेल असे सांगितले. अशा अनेक आख्यायिका प्रचलित आहे.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)