Lalbaugcha Raja 2023 | नोटांच्या माळा, सोन्याचे दागिने लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण, पाहा VIDEO

Lalbaugcha Raja 2023 | काल पहिल्याच दिवशी इतक्या लाख भाविकांनी घेतलं दर्शन. दिवसाचे 24 तास करीरोड, चिंचपोकळी आणि लोअर परेल रेल्वे स्थानक गर्दीने फुललेलं आहे. या तिन्ही रेल्वे स्थानकापासून लालबागच्या राजाचा मंडप काही मिनिट अंतरावर आहे.

Lalbaugcha Raja 2023 | नोटांच्या माळा, सोन्याचे दागिने लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण, पाहा VIDEO
Lalbaugcha Raja 2023
Follow us
| Updated on: Sep 20, 2023 | 2:37 PM

मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रात कालपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. पहिल्यादिवसापासून गणेशोत्सवाचा प्रचंड उत्साह भाविकांमध्ये दिसून येतोय. घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये गणपती बाप्पांची मनोभावे पूजा सुरु आहे. आज गणेशोत्सवाचा दुसरा दिवस आहे. दीड दीवसाच्या बाप्पाच आज विसर्जन होईल. मुंबईत सार्वजनिक मंडळातील मोठ्या गणेश मुर्ती आणि देखावे चर्चेचा विषय असतो. मुंबईत लालबाग नगरीत स्थापन होणाऱ्या लालबागच्या राजाची देशभरात चर्चा असते. गणेशोत्सवाच्या दहा दिवसात देशभरातून भाविक लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येतात. नवसाला पावणारा गणपती अशी लालबागच्या राजाची ओळख आहे. यंदाही गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून लालबागच्या राजाच्या दर्शनाला गर्दी उसळली आहे. भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

लालबागच्या राजाला चरण स्पर्श करता यावा, मुख दर्शन व्हावं यासाठी अनेक तास भाविक रांगेत उभे राहतायत. काल मंगळवारी पहिल्याच दिवशी तब्बल 25 लाखाहून अधिक भाविकांनी लालबागच्या राजाच दर्शन घेतलं. दिवसाचे 24 तास करीरोड, चिंचपोकळी आणि लोअर परेल रेल्वे स्थानक गर्दीने फुललेलं आहे. या तिन्ही रेल्वे स्थानकापासून लालबागच्या राजाचा मंडप काही मिनिट अंतरावर आहे. त्यामुळे दूर अंतरावरुन ट्रेनने भाविक लालबाग नगरीत येत आहेत. लालबागमध्ये मुंबईचा राजा गणेशगल्ली, तेजुकाय, चिंचपोकळीचा चिंतामणी हे गणपती सुद्धा प्रसिद्ध आहेत. कुठल्या बँकेचे कर्मचारी मोजणार रक्कम?

लालबागच्या राजाच्या मंडपात ठेवण्यात आलेली दानपेटी आज उघडण्यात आली. पहिल्याचदिवशी भाविकांनी भरभरुन लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलं आहे. रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने या दानपेटीत आहेत. नोटांच्या माळा यामध्ये आहेत. बँक ऑफ महाराष्ट्र बँकेचे कर्मचारी लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण करण्यात आलेली रक्कम मोजणार आहेत. हे दागिने किंवा रक्कम किती आहे? ते मोजदाद झाल्यानंतरच समजेल.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.