Ganesha Utsav 2022: गणपती बाप्पाच्या कोणत्या मूर्ती पूजनाने पूर्ण होतील मनातील इच्छा आणि दूर होईल दु:ख ! जाणून घ्या……

गेली अनेक शतकं, पिढ्यांपासून गणपतीच्या पूजेमुळे सर्व संकटांवर मात करता येते आणि आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात, गजाननाच्या कोणत्या मूर्तीच्या पूजमेुळे आपले जीवन मंगलमय होईल, जाणून घेऊया.

Ganesha Utsav 2022: गणपती बाप्पाच्या कोणत्या मूर्ती पूजनाने पूर्ण होतील मनातील इच्छा आणि दूर होईल दु:ख ! जाणून घ्या......
गणपती बाप्पाचं पूजनImage Credit source: social
Follow us
| Updated on: Aug 29, 2022 | 5:02 PM

मुंबई : गणपती बाप्पा (Ganapti) हा सर्वांचाच आवडता देव. सर्व भक्तगण भाद्रपद महिन्यातील (Bhadrapad Month) चतुर्थीची खूप वाट पहात असतात. कारण याच दिवशी 10 दिवसांपर्यंत चालणाऱ्या गणेशोत्सवाची (Ganesh Utsav) सुरूवात होते. गणपती ही विद्येची देवता, तो दु:ख हरण करतो आणि सर्वांना सुख देतो. गजाननाच्या पूजेमुळे (Ganesh Pooja) संकटांवर मात करता येते आणि आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात, असे मानले जाते. गणेश चतुर्थीच्या दिवशी सर्व भक्त आपापल्या क्षमतेनुसार, सोनं, चांदी अथवा मातीने बनलेली गणपतीची मूर्ती घरी आणून त्याची विधिवत स्थापना करतात आणि त्या मूर्तीची पूजा करतात. सर्व संकटे दूर करणाऱ्या मंगलमूर्ती गणेशाच्या, वेगवेगळ्या धातूने बनलेल्या प्रत्येक मूर्तीच्या पूजेचे एक धार्मिक महत्व असते. गणपतीच्या कोणत्या धातूने बनलेल्या मूर्तीच्या पूजनाचे काय फळ मिळते, याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

सोन्याचा गणपती –

असे म्हटले जाते की सोन्याने बनलेल्या गणपतीच्या मूर्तीची पूजा केल्यास आपल्या शत्रूंवर विजय मिळवता येतो आणि सुख-सौभाग्य मिळते. जर तुम्ही काही कारणांमुळे गणेशाची सुवर्ण प्रतिमा अथवा मूर्ती आणू शकत नसाल तर त्याजागी हळदीने बनलेली मूर्ती ठेवून त्याचे पूजन करून हे लाभ प्राप्त करू शकता.

चांदीचा गणपती –

चांदीच्या गणपतीच्या प्रतिमेचे पूजन केल्याने त्या व्यक्तीच्या आर्थिक समस्या दूर होतात आणि धन-धान्याची प्राप्ती होते, असे मानले जाते. चांदीच्या गणपतीचे पूजन केल्यास कुटुंबातील सदस्यांचा एकमेकांवरील विश्वास आणि प्रेम वाढते.

स्फटिकाचा गणपती –

स्फटिकाच्या गणपतीची मूर्ती ही सर्वात शुभ आणि मनातील इच्छा लवकर पूर्ण करणारी असते, असे मानले जाते. स्फटिकाने बनलेल्या गणेशाची पूजना केल्या गणपती बाप्पा लवकर प्रसन्न होतो आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतो, असेही मानतात.

पाऱ्याचा गणपती –

गणेश चतुर्थीच्या दिवशी पाऱ्याने बनलेल्या गणपतीची पूजा केल्यास व्यक्तीच्या जीवनातील मोठ्यातमोठी बाधा किंवा संकट त्वरित दूर होते. तसेच त्या व्यक्तीला सर्व प्रकारचे सुख-सौभाग्य मिळते

श्वेतार्क गणपती –

आक वनस्पतीच्या मुळापासून बनवलेली गणपतीची मूर्ती ही श्वेतार्क गणपतीच्या नावाने ओळखली जाते. श्वेतार्क गणपतीचे पूजन केल्यास सर्व प्रकारच्या बाधा किंवा नजर लागणे हे दोष दूर होतात. आणि भविष्यात अशी नजर लागण्यची कोणतीही भीती रहात नाही, असे म्हटले जाते.

कडुनिंबाचा गणपती –

कडुनिंबाच्या लाकडापासून बनलेल्या गणपतीच्या मूर्तीची पूजा केल्यास शत्रूवर विजय मिळवता येतो आणि भविष्यात कोणापासूनही धोका नसतो, असे मानले जाते.

चंदनाचा गणपती –

पूर्वीच्या काळापासून चंदनाचे लाकूड हे खूप पवित्र मानले जाते. चंदनाच्या लाकडापासून बनलेल्या गणपतीचे पूजन केल्यास त्या व्यक्तीचे मन निर्मळ आणि पवित्र होते. आणि त्या व्यक्तीस भौतिक व अध्यात्मिक दोन्ही सुखं मिळतात.

मातीचा गणपती –

हिंदू धर्मात माती अतिशय पवित्र मानली जाते. मातीला आई म्हटले जाते. त्यामुळेच मातीपासून बनलेल्या गणपतीच्या मूर्तीचे पूजन केल्यास भक्तांना अनेक यज्ञ केल्यासारखेच फळ मिळते आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.

( टीप – येथे देण्यात आलेली उपलब्ध स्त्रोतांवरून देण्यात आलेली आहे. यातील तथ्यांबद्दल आम्ही कोणताही दावा करत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.