Ganesh Visarjan 2023 : गणेश विर्जनाच्या दिवशी करा हा प्रभावी उपाय, गणपती देईल भरभरून आशिर्वाद
गणेश विसर्जनाचा (Ganesh Visarjan 2023) दिवस हा गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी सर्वोत्तम वेळ आहे. यावर्षी 28 सप्टेंबर म्हणजेच उद्या अनंत चतुर्दशी आहे, त्यामुळे उद्या ठिकठिकाणी गणेश विसर्जन केले जाणार आहे.
मुंबई : अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्या गाडक्या बाप्पाला निरोप दिला जातो. गणेशोत्सवाच्या 10 दिवसांनंतर, या दिवशी ढोल-ताशांच्या तालावर नाचत गणपती बाप्पाचे विसर्जन केले जाते. गणेश विसर्जनाचा (Ganesh Visarjan 2023) दिवस हा गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी सर्वोत्तम वेळ आहे. यावर्षी 28 सप्टेंबर म्हणजेच उद्या अनंत चतुर्दशी आहे, त्यामुळे उद्या ठिकठिकाणी गणेश विसर्जन केले जाणार आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जन करण्यापूर्वी काही खास उपाय करणे लाभदायक ठरेल. या उपायांमुळे श्रीगणेशाचा अपार आशीर्वाद मिळेल. जोतिषशास्त्राच्या दृष्टीकोणातून विचार केल्यास बुध ग्रहही शुभ फल देऊ लागेल. गणेश विसर्जनाच्या आधी केलेल्या या उपायांमुळे जीवनातील अनेक समस्या दूर होतील. जाताना बाप्पा आपल्या भक्तांना सुख, समृद्धी, संपत्ती, उत्तम आरोग्य, आनंद आणि बुद्धिमत्तेचा आशिर्वाद देईल.
अनंत चतुर्दशीचे उपाय
आर्थिक संकट दूर करण्यासाठी : आर्थिक संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जनाच्या आधी श्रीगणेशाला गुळ आणि गाईच्या तुपाचा नैवेद्य दाखवावा. यामुळे तुमचे आर्थिक संकट दूर होईल आणि पैशाचा ओघ वेगाने वाढू लागेल. आपल्या आवडीचा जीवनसाथी मिळण्यासाठी उपाय : ज्या तरुण-तरुणींना आपल्या वैवाहिक जीवनात अडथळे येत आहेत किंवा आपल्या आवडीचा जीवनसाथी मिळण्यात अडचण येत आहे, त्यांनी गणेश विसर्जनाच्या आधी श्रीगणेशाला हळद आणि शेंदूर मिसळून अर्पण करावे. तसेच लग्न लवकर व्हावे अशी प्रार्थना गणपती बाप्पाला करा. गणेशजी तुमची भक्तिभावाने केलेली प्रार्थना नक्कीच ऐकतील.
वाणी दोष दूर करण्याचे उपाय : कुंडलीत बुध कमजोर असेल तर व्यक्तीला वाणीशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो. जसे की, तोतरेपणा, बोलण्यात आत्मविश्वास कमी असणे इ. याशिवाय, दुर्बल बुध माणसाला अतार्किक बनवतो. अशा लोकांनी गणेश विसर्जनाच्या आधी केळीचा हार करून गणपती बाप्पाला अर्पण करावा. यामुळे बुध बलवान होऊन शुभ परिणाम देईल.
सुख-समृद्धी मिळविण्याचे उपाय : गणेश विसर्जनाच्या आधी पूर्ण भक्तीभावाने गणेशाला दुर्वी आणि मोदक अर्पण करावेत, नंतर प्रसाद वाटावा. या उपायाने तुमच्या जीवनात सुख-समृद्धी येईल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)